Husband Wife Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: शॉर्ट ड्रेसवरुन नवरा-बायकोमध्ये वाद, नवऱ्यांची नेमकी अडचण काय होती? पाहा VIDEO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wife Husband Viral Video

नवरा बायकोच नातं कायमच अनोख मानल जात. प्रेमाप्रमाणेच नवरा-बायकोमध्ये भंयकर वाद आणि हाणामाऱ्या होताना पाहायला मिळतात. बऱ्याच काळापासून भारतात अनेक ठिकाणी सुशिक्षित महिलाही हुंडा तसेच कौटुंबिक हिंसाराच्या बळी ठरल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एक तरूणी आपली बाजू मांडून आपल्या पतीला प्रत्युत्तर करत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नक्की वादाचे कारणं काय ते पाहूयात

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की सुरूवातील व्हिडिओत एक तरूणीने मिनी ड्रेस परिधान केलेला आहे. यात तरूणीने परिधान केलेल्या टॉपचा रंग जाभंळा तर काळ्या रंगाचा स्कर्ट आहे. मात्र व्हिडिओमध्ये जवळच असलेला तिचा नवरा तिला तिच्या परिधान केलेल्या ड्रेसवरून वाद घालताना दिसत आहे. नवरा तिला बोलत आहे की,हा कोणता ड्रेस आहे?'. व्हिडिओच्या शेवटपर्यंत नवरा तिला हाच प्रश्न विचारात आहे. परंतू तरूणी आपल्या नवऱ्याला योग्यरित्या प्रत्युत्तर करत आहे.

सगळा खेळ व्हायरल होण्यासाठी

मिळालेल्या माहितीनूसार, व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडीओमागचे कारण समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण व्हायरल होणाऱ्या जोडप्याने आपले सोशल मीडियावरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी असा व्हिडिओ केल्याच समोर येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स (ट्वीटर)सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील@gharkekalesh या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये पती-पत्नीच्या भाडंणाचे कारण लिहिले आहे. मात्र व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकल नाही.

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की,'हे स्क्रिप्ट केलेले असावे' तर बाकी नेटकऱ्याने तरुणीचे कौतूक केले आहे. व्हिडिओला २ लाखाहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईकस् मिळत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT