Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: लय माज आलाय! छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोरींनी पळवून पळवून हाणलं, VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर तुम्हाला होळीच्या निमित्ताने अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले. मात्र त्या भर पडली ती एका धक्कादायक व्हिडिओची ज्यात व्हिडिओ होळीच्या दिवशी काही तरुणांकडून तरुणींची छेड काढण्यात आली.

Tanvi Pol

Fighting Viral Video: हरियाणाच्या सोनीपत येथे होळीच्या दिवशी घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. काही टवाळखोरांनी होळीच्या दिवशी काही तरुणींना छेडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या मस्तीचा फुगा अवघ्या काही मिनिटांतच फुटला. त्या तरुणींनी एकत्र येत टवाळखोरांना जमिनीवर पाडत चांगलाच चोप दिला.

छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, पण मिळाली चोख शिक्षा!

होळी(Holi) म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो. मात्र, हा सण आनंदाने साजरा करण्याऐवजी काहीजण त्याचा गैरफायदा घेत असतात. होळीच्या रंगाच्या नावाखाली मुलींना ,महिलांना विनाकारण स्पर्श करणे आणि छेडछाड करणे शिवाय जबरदस्ती रंग लावणे असे प्रकार काही ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, यावेळी या काही तरुणींनी हे सहन केले नाही आणि त्यांनी थेट त्या टवाळखोरांना पकडून त्यांची चांगलीच धुलाई केली.

लोकांच्या डोळ्यासमोर घडला थरार!

या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही घराबाहेर तरुणी रंग खेळत असतात. मात्र त्याच वेळी काही तरुणी दोन तरुणांना जोरदार हाणताना दिसत आहेत. तरुणींचा मार खात असलेले तरुण स्वत:च्या बचावासाठी तरुणींना मारत आहे शिवाय तेथून पळ काढण्याचा पुरेपुर प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, व्हिडिओत पाहिले तर तरुणी त्या तरुणांना अक्षरशा: रस्त्यावर पाडून पाडून मारताना दिसत आहे. हा सर्व प्रकार घराबाहेर असलेल्या काही व्यक्तींनी कॅमेऱ्यात कैद केला आहे.

व्हिडिओ(Video) व्हायरल होताच सोशल मीडियावर या घटनेचं कौतुक होत असून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''parulgscl3'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकांनी तरुणींच्या धाडसाचे कौतुक केले आहे तर काहींनी अजून त्या टवाळखोरांना मारायला पाहिजे असे सांगितले आहे.

टीप: तरुणींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT