Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सापाने अडवला रस्ता, बघून ट्रकवालाही मागे फिरला; VIDEO व्हायरल

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या सिंधुदुर्गमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात रस्त्याच्या मधोमध भलामोठा साप आला आहे. ज्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते.

Tanvi Pol

Snake Viral Video: सोशल मीडियावर सध्या सिंधुदुर्गमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात मुख्य रस्त्यावर चार ते पाच फुटाचा साप रस्त्यावर येऊन फणा काढून उभा होता, मात्र रस्त्यावरच सापाने ठाण मांडल्यामुळे काही वेळ याठिकाणी ट्राफिक जाम झाले होते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक महामार्ग दिसत आहे. मात्र व्हिडिओत तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की एक भला मोठा साप रस्त्याच्या अगदी मधो-मध उभा आहे. सापाच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी गर्दी झालेली आहे. साप(Snake) फणा काढून उभा राहिल्याने वाहन चालकांची भंबेरी उडाली आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर अनेक जण सापाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करत आहे तर अनेकजण घाबरुन तेथून पळ काढताना दिसत आहे.

नेमकी घटना कुठली?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सिंधुदुर्गमधील तिलारी- दोडामार्ग मुख्य रस्त्यावरील आहे.जवळपास अर्धा तास हा साप रस्त्यावर ठाण मांडून होता. यावेळी दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वेळाने हा साप रस्त्यावरून जंगलात गेल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र रस्त्यावरच सापाने ठाण मांडल्यामुळे काही वेळ याठिकाणी ट्राफिक जाम झाले होते.

मात्र सध्या सर्व व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून त्या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या पूर्वीही असे अनेक व्हायरल झालेले व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

टीप : सध्या व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalsubai peak : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

SCROLL FOR NEXT