Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बॉयफ्रेंडवरुन चौघी भिडल्या, रस्त्यावर राडा; लाथा बुक्क्यांनी मारहाण, झिंज्या ओढल्या|VIDEO

Girl Fight Viral Video: इंदोरमध्ये रविवारी रात्री मुलींच्या ग्रुपमध्ये जबरदस्त भांडण झाले. त्यांच्या लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Siddhi Hande

रोज सोशल मीडियावर हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ हे दिल्ली मेट्रोतील हाणामारीचे, जुगाडचे असतात. मारामारी म्हटल्यावर सर्वात आधी दिल्ली मेट्रोच डोळ्यासमोर येते. परंतु आता दिल्ली मेट्रोनंतर मध्यप्रदेशमधील इंदोर येथे रस्त्यावरच मुलींमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. चार -पाच मुलींच्या ग्रुपमध्ये जोरदार भांडण झाले त्यानंतर लाथाबुक्क्यांनी त्यांच्यात मारामारी झाली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Girl Fight Viral Video)

मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर येथे ही घटना घडली आहे. इंदोरमध्ये भररस्त्यात मुला-मुलींच्या ग्रुपमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर ४-५ मुली एकमेकांना मारायला लागल्या. मध्यरात्री रस्त्यावर पडून एकमेकांना मारत होत्या. त्यांच्या या मारामारीमुळे रस्त्यावरील अनेक लोक तिथे जमा झाले. त्यांनी या मुलींना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला.

रविवारी रात्री इंदोरमधील विजयनगर ठाणे क्षेत्रात ही घटना घडली. येथील एका पबमध्ये या मुली पार्टी करत होत्या. त्यावेळी त्यांनी दारु प्यायली होती. दारुच्या नशेत त्यांनी एकमेकांसोबत मारामारी केली आहे. बॉयफ्रेंडमुळे त्यांच्या भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका मुलामुळे मुली एकमेकांना भिडल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु या मुली काही केल्या थांबत नव्हत्या. त्यांचे भांडण सुरुच होते.

मुलींचा एकमेकींना धक्का लागला. त्यातूनच हा वाद आणखी वाढला. त्यांनी एकमेकींना खाली पाडत मारामारी केली. त्यांच्या या मारामारीचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT