Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पुण्यात दारू दुकानात तुफान राडा! नशेत बेभान होऊन एकमेकांवर तुटून पडले

Pune Viral News: सध्या पुण्यातील एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे. व्हायरल व्हिडिओ हा एका दारुच्या दुकानातील आहे, मात्र वादाचे आणि हाणामारीचे कारण काय ते पाहा.

Tanvi Pol

Puen Viral Video: पुण्यातील ओतुर येथे देशी दारूच्या दुकानात दारू खरेदीनंतर पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद उफाळला. हा वाद इतका तीव्र झाला की दुकानात हाणामारी सुरु झाली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमके घडले काय?

या प्रकरणात दुकानातील कामगार शुभम सिंग आणि दत्तात्रय फापाळे यांच्यात सुरू झालेला वाद विकोपाला गेला. वादाचे कारण दहा दारूच्या बाटल्यांच्या खरेदीवरून पैशाच्या व्यवहारावरून निर्माण झाले होते. या वादाचा राग मनात धरून दत्तात्रय फापाळे यांच्यासह चार पुरुष आणि दोन महिलांनी मिळून दुकानातच शुभम सिंग याला मारहाण (Beating)केली.

विशेष म्हणजे, या हाणामारीत महिलांनीही सहभाग घेतला आणि दुकानातील दारूच्या बाटल्या फोडून नुकसान केले. या घटनेची गंभीर दखल घेत ओतुर पोलिसांनी तातडीने कारवाई केली शुभम सिंग यांच्या फिर्यादीवरुन दोन महिलांसह चार पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ काही क्षणात मोठ्या संख्येने पाहिला गेला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एक यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले,''चांगला चोप द्या आणि दुकाने बंद करा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''अजून हाणा बर झालं'' ऐवढेच नाही तर काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला असून अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

Chanakya Niti: हुशार लोक या 6 ठिकाणी धाडस दाखवत नाहीत; खड्ड्यात पडण्यापासून व्हा सावध, वाचा चाणक्यांचा सल्ला

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

SCROLL FOR NEXT