Viral Video: Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भर वर्गात शिक्षिकांची कुस्ती; एकमेकींना कुट कुट कुटलं, जमिनीवर पडेस्तोवर मारलं, VIDEO

Teacher Fight Video: सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्या व्हिडिओमध्ये चक्क दोन शिक्षिकेंची तुफान हाणामारी होताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Fighting Video: जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्त आणि संस्कारांचे धडे देतात, त्यांनीच जर WWE रिंगसारखी फाईट करायला सुरुवात केली, तर काय गोंधळ उडेल? सध्या असचं काहीसं भन्नाट प्रकरण एका शाळेत घडलंय, जिथे दोन महिला शिक्षिका एकमेकींवर चांगल्याच तुटून पडल्या आहेत शिवाय सर्व घटनेचा व्हिडिओस सोशल मीडिया माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला शाळा दिसत असून विद्यार्थ्यांची पळापळ सुरु आहे. मात्र, व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की, शाळेतील दोन महिला शिक्षिका एकमेंकीना मारताना दिसत आहे. दोघींची हाणामारी इतकी जोरदार आहे की त्या अक्षरश:एकमेंकीच्या अंगार बसून हाणत आहे. अन्य शिक्षिका येऊन सर्व प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यातील कोणीही थांबण्याचे नाव घेत नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे शिवाय तो नेटकरी वर्गात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, हा व्हिडिओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी हजारो लाईक्स मिळालेले असून मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहे.

आता काय होणार?

या शिक्षिकांचा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. शिवाय या शिक्षिकांना आता निलंबित करणार का? असा सवाल अनेक नेटकरी वर्गातून विचारला जात आहे. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''धम्माल हाणामारी केली राव'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कसं व्हायच विद्यार्थ्यांच'' तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime : "जीव होता तो माझा..." विवाहितेने आयुष्याचा दोर कापला, हातावर मन सुन्न करणारा मजकूर अन्...

IND Vs SA: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कशी असणार भारताची प्लेईंग ११; या खेळाडूचा पत्ता होणार कट?

Sunscreen Sun Protection: दररोज सनस्क्रीन लावल्याने व्हिटॅमिन D ची कमतरता होते का?

Vastu Tips: घरात झाडू कोणत्या दिशेला ठेवावा? तुम्हीही चूक करत असाल तर योग्य दिशा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आल्यानंतर शेतात रमले

SCROLL FOR NEXT