Cheese Chocolate Gola Saam Tv
व्हायरल न्यूज

Cheese Chocolate Gola: चीझ चॉकलेट बर्फाचा गोळा बघून नेटकऱ्यांचं डोकं सटकलं; VIDEO VIRAL

Cheese Chocolate Gola Viral Video: उन्हाळ्यात नागरिकांना गर्मीचा खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात थंड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करायचे असते. त्यामुळे गर्मीपासून वाचण्यासाठी लोक आईस्क्रिम आणि बर्फाचा गोळा खातात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्यात नागरिकांना गर्मीचा खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात थंड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करायचे असते. त्यामुळे गर्मीपासून वाचण्यासाठी लोक आईस्क्रिम आणि बर्फाचा गोळा खातात. उन्हाळ्यात आईस्क्रिमची मागणी जास्त प्रमाणात वाढताना दिसते. या आईस्क्रिममध्ये आणि बर्फाच्या गोळ्यात वेगवेगळे फ्लेवर्स असतात. मात्र, तुम्ही कधी चीझचा गोळा खाल्ला आहे का? याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपण आतापर्यंत आईस्क्रिम किंवा बर्फाच्या गोळ्यात वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय केले आहेत. त्यात स्ट्रॉबेरी, चॉकलेट, बटरस्कॉच तर बर्फाच्या गोळ्यात ऑरेंज, काला खट्टा असे फ्लेवर्स खाल्ले आहेत. मात्र आता बर्फाच्या गोळ्यात अजून एक नवीन फ्लेवर सध्या पाहायला मिळत आहे. तो म्हणजे चीझ गोळा. चीझ गोळा बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत बर्फाचा गोळा बनवताना दिसत आहे. एक व्यक्ती एका वाटीत सर्वप्रथम बर्फ टाकतो. त्यानंतर त्यावर रबडी, साखर, ट्रुटी फ्रुटी, ड्रायफ्रुट्स आणि चॉकलेट टाकतो. यानंतर तो या बर्फाच्या गोळ्यावर चीझ किसून टाकताना दिसत आहे. याच रेसिपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

sidshahofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आजकाल कशात काय मिक्स करतीय याचा भरवसा नाही, बर्फाचा गोळा खायचा की नाही, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT