Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: आजोबा म्हणजे आजोबाच असतो...! आजोबा अन् नातीमधल्या भावूक प्रंसगांचा VIDEO व्हायरल

Viral Video: सर्वांच्या आयुष्यात आजी आणि आजोबांचे स्थान महत्वाचे असते. नातवांचे पहिले मित्र हे आजोबाच असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video

सर्वांच्या आयुष्यात आजी आणि आजोबांचे स्थान महत्वाचे असते. नातवांचे पहिले मित्र हे आजोबाच असतात. या नात्यामधला प्रेमाचा ओलावा आपल्याला कायमच दिसून येत असतो. हे नातं असं आहे ज्यात कोणताही स्वार्थ नसतो. आजोबा आणि नातंवाचं नातं काही विशेष असतं.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजोबा म्हणजे घराचा आधार. सोशल मीडियावरही आजोबा आणि नातवंडांचे काही गोड प्रसगांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर आजोबा आणि नातीच्या नात्यातला जिव्हाळा दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आजोबांना गावी जाताना पाहून चिमुकल्या नातीला रडायला आलं. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा हातात पिशवी धरुन गावाला जायला निघाले आहेत. तितक्यातच तिथे एक चिमुकली नात येते आणि रडायला सुरुवात करते. तशीच ती सरळ घरात निघून जाते. तिला रडताना पाहून तिचे आजोबाही भावूक होताना तसंच तिला समजवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला व्हिडीओत दिसत आहेत. नातीचं आजोबांवरील प्रेम पाहून प्रत्येकाला आपले बालपण नक्कीच आठवले असेल.

व्हायरल व्हिडीओ हा @rammore35या इन्स्टांग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजू शकलेलं नाही.एका यूजरने म्हटलं आहे,' किती सुंदर क्षण आहे डोळे पाणावले हा व्हिडिओ बघुन' तर आणखी एका युजरने म्हटलं आहे 'आजपर्यंतचा सगळ्यात चांगला व्हिडिओ.' व्हायरल होत असलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Pack लावल्यावर त्वचा कोरडी होते? मग मऊ अन् तजेलदार त्वचेसाठी 'हे' पदार्थ फेस पॅकमध्ये मिक्स करायला विसरू नका

काल एकनाथ शिंदेंची भेट, आज काका-पुतणे एकत्र; राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय? VIDEO

Maharashtra Live News Update : . चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये पोलिस अधिकारी व शिवप्रेमींमध्ये बाचाबाची

Chanakaya Niti Tips Of Happy Married Life : नवरा-बायकोची भांडणं कधीच होणार नाही , ५ नियम प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवेत

शिवजयंती मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला; शिवभक्तांची धावपळ उडाली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT