Viral Video सौजन्य - एनडीटीव्ही हिंदी न्यूज
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या कर्नाटकातील अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की अपघात कसा घडला ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Udupi Viral News: सोशल मीडियावर सध्या धक्कादायक अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या घटनेत मुलांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला पलटली. या घटनेत व्हॅनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र संपूर्ण घटनेने परिसरात गोंधळ उडाला होता. सध्या सर्व घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रस्त्याच्या कडेला काही विद्यार्थी खांबलेले आहेत. शिवाय अनेक व्यक्तीही दिसून येत आहेत. काही वेळात रस्त्याच्या एका बाजून भरधाव वेगात एक व्हॅन येताना दिसत आहे मात्र येणारी व्हॅन रस्त्याच्या कडेला येऊन पलटी होते. मात्र या व्हॅनमध्ये शाळेतील विद्यार्थी होते. क्षणात विद्यार्थ्यांना(Student) व्हॅनमधून काढण्यासाठी घटनास्थळी असलेले नागरिक मदतीसाठी धावून जातात आणि व्हॅनमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढतात. सध्या या घनटेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेली घटना कर्नाटकातील उड्डपी येथील आहे. मात्र तो व्हिडिओ 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''ndtvindia'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

एवढेच नाही तर थरारक सीसीटीव्ही पाहून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''मला आशा आहे की मुले आणि ड्रायव्हर सुरक्षित आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''देवाचे आभार सर्व ठीक आहे'' तर अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT