Drunk Man Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दारुड्याची अजब करामत! मृत समजून बाहेर काढले तर अचानक डोळे उघडले; VIDEO VIRAL

Drunk Man Viral Video: सोशल मीडियावर सध्या तेलंगणातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दारु पिऊन एक व्यक्तील तलावात पडलेला दिसत आहे. हे पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याला मृत समजले. परंतु त्याला पाण्यातून बाहेर काढताच तो अचानक जिवंत झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या उकाडा खूप वाढत आहे. पावसाळा सुरु झाला असला तरीही उन्हाळा काही संपायचे नाव घेत नाही. त्यामुळेच अनेक लोक थंड पाण्याने अंघोळ करतात. फिरण्यासाठी रिसॉर्ड, वॉटर पार्कला जातात. तर गावाकडे अनेक लोक तलावात, विहरीत पोहण्यासाठी जातात. परंतु जर एखादा व्यक्ती दारु पिऊन एखाद्या तलावात पडलेला दिसला तर तुम्ही त्याला वेबारस किंवा मृत म्हणून घोषित कराल. अशीच एक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. तेलंगणामध्ये दारु पिऊन तलावात पडलेल्या एका माणसाला पोलिसांनी मृत म्हणून घोषित करुन बाहेर काढले. तर तो व्यक्ती जिवंत असल्याचे समजले. वाढत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा म्हणून तो व्यक्ती तलावात गेला होता, असे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील हनुमाकोंडा येथील तलावात ही घटना घडली आहे. या तलावात एक व्यक्ती निपचित पडून होता. हा व्यक्ती दारुच्या नशेत होता. हे दृश्य पाहून आजूबाजूच्या लोकांना तो व्यक्ती मृत असल्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वैदयकीय सेवा पथकासह घटनास्थळी भेट दिली. तिथे एक पोलिस कर्मचाऱ्याने या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी त्याचा हात धरुन बाहेर काढले. त्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढताच त्याने डोळे उघडले. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा व्यक्ती मृत नसून तो पाण्यात स्वतः हून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती जवळपास ५ तास या तलावात होता. तो सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी १२ पर्यंत तलावात होता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना तो व्यक्ती मृत असल्यासारखे वाटले. हा व्यक्ती दारुच्या नशेत होता. तो गेल्या दहा दिवसांपासून १२ तासांची शिफ्ट करत होता. याचा त्याला खूप त्रास होत होता. त्यामुळेच त्याने आपला थकवा घालवण्यासाठी तलावाच डुबकी मारण्याचा विचार केला होता. त्यामुळेच तो व्यक्ती तलावात गेला होता.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT