Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मालकाला रुग्णवाहिकेत बघताच कुत्रा जीवाच्या आकांताने धावला; VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

Dog Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक पाळीव कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस येत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी पाळीव कुत्र्यापासून ते माजंर असे प्राणी दिसून येतात. माणसांचे आणि कुत्र्याचे नाते खूप जुने आहे. आपल्या मालकांच्या प्रति पाळीव कुत्र्यांना जाणीव असल्याचे आपल्याला कायम दिसून आलेले आहे. सोशल मीडियावर यासंबंधित अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या परत एकदा कुत्र्याचे आणि त्याच्या मालका प्रति असलेले नाते पाहायला मिळाले आहे, ज्यात मालकाला रुग्णवाहिकेमधून नेत असताना कुत्रा वाहनाच्या मागे धावत जातो.

व्हायरल व्हिडिओत काय?

व्हायरल (Viral) व्हिडिओत एक रुग्णवाहिका रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. या रस्त्यावर अनेक वाहने एका लाईनमध्ये उभी आहे. मात्र याच रस्त्यावरुन रुग्णवाहिकेच्या पाठी धावणारा एक कुत्रा दिसत आहे. मात्र काही वेळात धावणाऱ्या कुत्र्याला (Dog) रुग्णवाहिकेच्या चालकाने पाहिल. त्यानंतर त्याने रुग्णवाहिका थांबवून कुत्र्याला रुग्णवाहिकेच्या आत चढून दिले. सर्व प्रकार रुग्णवाहिकेच्या पाठीमागून जाणाऱ्या व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ (Video) कुठल्या देशातील आहे हे समजू शकलेले नाही. व्हायरल व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''@pinkvilla'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर याआधीही सोशल मीडियावर मालक आणि पाळीव प्राण्यांचे अनोखे नाते दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे.

प्रतिक्रिया

व्हिडिओ साधारण एक दिवसापूर्वी पोस्ट होताच ८१ हजारापेक्षा अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती मिळाली आहे तर अजूनही मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज (Views) मिळाले आहेत. तर असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की, ''खूपच छान'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,'' किती भाग्यवान आहे मालक'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की,'' आजच्या दिवसातील सर्वात भावनिक व्हिडिओ'',अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT