Delhi Metro Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Video: दिल्ली मेट्रोत लेडीज डब्ब्यातून केला पुरुषांनी प्रवास, मग पोलिसांनी दिला चांगलाच चोप;VIDEO व्हायरल

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोत रोज लोक काही न काही अतरंगी करताना दिसतात. आतापर्यंत दिल्ली मेट्रोत डान्स, हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत होते. मात्र, आता दिल्ली मेट्रोच्या लेडीज डब्ब्यातून चक्क पुरुषांनी प्रवास केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ हे दिल्ली मेट्रोतील असतात. दिल्ली मेट्रो म्हटलं की मारामारी, प्रेमवीरांचा अड्डा, असंच वाटतं. सध्या दिल्ली मेट्रोत एक वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. दिल्ली मेट्रोतील लेडीज डब्ब्यात चक्क पुरुष प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी या पुरुष प्रवाशांना चांगलाच धडा शिकवला आहे. (Delhi Metro Video)

दिल्ली मेट्रोतील या व्हिडिओत दिल्ली मेट्रोच्या लेडीज डब्ब्यात पुरुष प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. एका मेट्रो स्टेशनवर ट्रेन थांबते. तेव्हा मेट्रोतील लेडीज डब्ब्यातून एक, दोन नव्हे तर अनेक पुरुष बाहेर येताना दिसत आहे.एखादा प्रवासी चुकून लेडीज डब्ब्यात जातो परंतु अनेक लोक एकाचवेळी लेडीज डब्ब्यात जाऊ शकत नाही. त्यामुळे लेडीज डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे.

दिल्ली मेट्रोतील या व्हिडिओत लेडीज डब्ब्याबाहेर पोलिस उभे राहिलेले दिसत आहेत. त्यानंतर मेट्रोचा दरवाजा उघडतो तेव्हा आतमधून अनेक पुरुष प्रवासी बाहेर येताना दिसत आहे. पुरुष प्रवासी बाहेर येत असतानाच प्रवाशांनी त्यांना चांगलाच चोप दिला आहे.

GharkeKalesh या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. महिलांच्या डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या पुरुषांना असाच चोप द्यायला हवा, हे पुरुष प्रवासी महिलांच्या डब्ब्यात गेलेच कसे? अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. (Delhi Metro Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्प

Famous Singer Death : संगीत क्षेत्रातला अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

महागड्या क्रिम्स कशाला? चेहऱ्याचे काळे डाग आणि खाज घालवण्यासाठी कापूर ठरेल वरदान; पाहा वापरण्याची योग्य पद्धत!

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

SCROLL FOR NEXT