Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: फालतू शायनिंग! धावत्या लोकलमधून चिमुकल्याचा जीवघेणा स्टंट; Video पाहून होईल संताप

Stunt Viral Video: मुंबई लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या मुलांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे,मात्र व्हिडिओत पुढे काय घडते ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Mumbai Local Train: सोशल मीडियावर मुंबई लोकलचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग कधी प्रवाशांच्या हाणामारीचे व्हिडिओ असतात तर कधी टिसी आणि प्रवाशांच्या बाचाबाची व्हिडिओ असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनमधीस स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र सध्या लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणारे तरुण नसून चक्क लहान मुलं आहेत.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की मुंबईची लोकल ट्रेन दिसत आहे. मात्र ही लोकल ट्रेन अतिशय वेगात आहे. ज्यात काही लहान मुलं आहेत जी लोकल ट्रेनच्या दरवाजात उभं राहून बाहेर हात आणि पाय काढत आहे. खरे तर ती लहान मुलं सर्व स्टंट करत आहेत. लोकल ट्रेनमधील अनेक प्रवासी त्यांना आत जाण्यास सांगत आहेत मात्र ती मुलं त्यांच ऐकत नाही, मात्र त्याच प्रवाशांनी मुलांच्या स्टंटबाजी(Stunt) व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केलेला आहे.

मुलांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, मात्र तो व्हिडिओ एक्सवरील ''@tv_mumbai'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''लोकल ट्रेनमध्ये जीवघेणा स्टंट'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे.

स्टंटबाजीचा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''कुठले आहेत ही पोर'' तर अनेक यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT