Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कुणीतरी येणार येणार गं...! चक्क मनीमाऊचं डोहळे जेवण घातलं, Video पाहून म्हणाल हौसेला मोल नसतं

Tanvi Pol

Cat Celebrate Baby Shower: सध्या प्रत्येकाच्या घरी आपल्याला कुत्रा आणि मांजर हे प्राणी पाळलेले दिसून येतात. या सर्व घरात असलेल्या पाळीव प्राण्यांची काळजी अगदी घरात असलेल्या मुलांप्रमाणे घेत असतात. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी कपड्यांपासून ते अनेक लहान लहान गोष्टी अगदी आवडीने करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका मांजरीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडत आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.

व्हायरल(Video) होत असलेल्या व्हिडिओत(Video) एक पांढऱ्या रंगाची मनी माऊ दिसत आहे. व्हिडिओ पुढे पाहिले तर एका महिलेच्या डोहाळ जेवणाच्या वेळी जसं सजावट आणि साहित्य असते त्या सारखेच साहित्य व्हिडिओत दिसून येत आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या मनी माऊला अतिशय सुंदररित्या सजवले आहे. तुम्हीही पाहा व्हायरल होत असलेला व्हिडिओ.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. मात्र तो इन्स्टाग्रामवरील @purple_thepersian_9 या अकाउंटवर एका दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच तब्बल लाखोच्या संख्येने नेटकऱ्यांनी पाहिला आहे तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्स मिळाल आहेत.

मनी माऊचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''डोहाळे जीवन कार्यक्रम, येनार घरी एक नवा पाहुना,बेबी शॉवर, डोहाळे जीवन, ओटी भरण कार्यक्रम,, आनंद घेत आहे, आई टू बी, जांभळी आई, मोहक, सौंदर्य राणी, चांगली'' असे लिहिण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

Wardha News: 'सत्ता आल्यावर लाडकी बहीणचे पैसे बंद', काँग्रेस नेत्यांच्या नावाने पोस्ट व्हायरल; भाजप कार्यकर्त्याविरोधात तक्रार

knee Pain: गुडघे खूप दुखतात? रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

SCROLL FOR NEXT