Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रीलच्या नादात लाखोंची कार राख, वरातीत फटाके फोडणे पडले महागात; VIDEO पाहा

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात कारच्या सनरुफमधून फटाके फोडणे महागात पडलेले आहे.

Tanvi Pol

Shocking Accident Video: सध्या सर्व आनंदाच्या प्रसंगात फटाके फोडण्यात येतात. मग कोणाचा वाढदिवस असो वा कोणाचे लग्न हमखास फटाके फोडतात. मग अनेकदा या फटाके फोडण्याच्या पायी काही दुर्घटना घडतात,ज्यात मोठी वित्तहानी होते. सध्या सोशल मीडियावर असात काहीसा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात एका लग्नाच्या वरातीत उत्साहात काहींनी कारच्या सनरुफमधून फटाके फोडले मात्र त्याचा परिणाम संपूर्ण कारला आग लागली.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला लग्नाची वरात काढली जात आहे. प्रत्येकजण या वरातीत सहभागी होत आनंद साजरा करत होता मात्र त्या दरम्यान या लग्नाच्या वरातीत एक कार होती ज्या कारच्या सनरूफमधून फटाके लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. मात्र यात फटाक्यांमुळे कारला संपूर्ण आग लागते. व्हिडिओत संपूर्ण कार आगीत जळत असताना दिसत आहे शिवाय फटाके(Crackers ) फुटताना दिसत असून नागरिक जीव वाचवण्यासाठी दुसरीकडे जात आहेत. सर्व घटना तिकडे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेली आहे

संपूर्ण व्हिडिओ एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेला असून तो व्हिडिओ एक्सवरील ''@Arifsitapur'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये झालेल्या घटनेचे कारण लिहिण्यात आलेले आहे, ज्यात,''लग्नाच्या मिरवणुकीत सनरूफ उघडून फोडत असलेल्या फटाक्यांमुळे कारला आग लागली'' असे लिहिले आहे. व्हिडिओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे समजू शकलेले नाही, मात्र सोशल मीडियावर व्हिडिओला लाखोच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओ व्हायरल होतात अनेक नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''काय गरज होती'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''अरे देवा'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''बाबो खूपच खतरनाक झाल आहे'',अशा अनेक हैरानजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

How To Increase Stamina : शरीराची ताकद वाढविण्यासाठी काय खावे?

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT