Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चोरी करायला आले अन् जाळ्यात अडकले... पोलिसांनी काढली धिंड, अहिल्यानगरचा व्हिडीओ समोर

Ahilya Nagar Video: सोशल मीडियावर सध्या अहिल्यानगरमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये असे काय घडते, ज्यामुळे व्हिडिओ व्हायरल होतोय. ते एकदा तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video News: अहिल्यानगर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पकडले गेलेल्या आरोपींची शहरभर वरात काढत पोलिसांनी जनतेत सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे शिवाय संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमके घडले तरी काय?

अहिल्यानगर शहरातील सारसनगर भागात (दि.२२) मार्च रोजी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी योगेश चंगेडीया यांच्या घराचे दरवाजे आणि खिडकीचे शटर कटरच्या साह्याने तोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ही बाब लक्षात येत योगेश चंगेडीया यांनी आरडाओरड करत शेजारी असलेल्या लोकांना फोन (Phone) करून जागे केले होते त्यामुळे चोरट्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढला होता.

या पळापळीमध्ये चोरट्यांनी आणलेली एक चार चाकी गाडी त्या ठिकाणीच सोडून चोरटे पळून गेले होते या पुराव्यांवर पोलिसांनी तपास केला असता, ते चार चाकी वाहनही चोरीचे निघाले होते. मात्र, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास करून या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेतले होते हे सर्व आरोपी सराईत चोरटे असून दरोडा टाकण्याचे उद्देशाने ते योगेश चंगेडीया यांच्या घरी गेले होते याची कबुली ही या आरोपींनी दिल्यानंतर कोतवाली पोलिसांनी या आरोपींची आज ते ज्या भागात राहतात त्या परिसरात वरात काढली होती.

कुणीही गैर कृत्य करू नये कायद्यानुसार सर्वांना कठोर शिक्षा (Punishment) होईल तसेच या आरोपींना मदत करणाऱ्यांना सोडणारा नाही असा इशारा देत चोरी दरोडे घालण्यासारखा चुकीचा मार्ग सोडून चांगले जीवन जागा असा संदेशही यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिला आहे.

टीप: अहिल्यानगरमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watermelon Storage Tips: कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवायचा की नाही? जाणून घ्या

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT