Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणाची बाईकवरुन जीवघेणी स्टंटबाजी! पुढचं चाक हवेत उंचावून बाईक चालवली; VIDEO पाहून नागरिक संतप्त

Shocking Stunt Video: सोशल मीडियावर वारंवार अनेक स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातच पुन्हा एकदा अशाच एका तरुणाच्या बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओ एकदा पाहाच.

Tanvi Pol

Dangerous Stunt Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेकदा धोकादायक स्टंट पाहण्यासाठी मिळतात.त्यातच एक असाच प्रकार समोर आला असून,एका तरुणाने बाईकवर बसून जीवघेणा स्टंट करत बाईक चालवली.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून लोकांनी या स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण रस्त्यावरुन बाईक चालवताना दिसतो.रस्त्यावरुन वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असताना त्यामध्ये हा तरुण बाईक चालवत स्टंटबाजी करताना दिसत आहे.ज्यामध्ये तो अतिशय वेगाने बाईक चालवक आहे शिवाय हेल्मेट न घालता इतर वाहनांमधून वाकडी-तिकडी बाईक चालवत असतो.हद्द तर तेव्हा होते तो तरुण एका व्यक्तीला धडकणार होता,मात्र थोडक्यात बचावला जातो.

स्टंटबाजीचा व्हिडिओ एक्सवरील ''Indian Observer'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी हजारो संख्येने लाईक्स केलेले आहे तर लाखोंच्या संख्येत व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत.तर अन्य काही यूजर्संनी व्हिडिओला अन्य माध्यमांवर शेअरही केलेला आहे.

तरुणाचा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.मात्र त्यातील एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे,''पोलिसांची भिती तरुणांना का वाटत नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''चांगलाच पोलिसांनी चोपला पाहिजे'' तर अशा अनेक रागीट प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT