Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पिसाळलेल्या हत्तीचा धुमाकूळ, कार उचलली अन् धाड धाड आपटली, धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हायरल व्हिडिओत एका ठिकाणी पिसाळलेल्या हत्तीने धुमाकूळ घातलेला आहे.

Tanvi Pol

Viral Video: महाराष्ट्र नाही तर आपल्या देशात दर महिन्याला अनेक सण उत्सव साजरे केले जातात. साजरा करण्यात येणारे प्रत्येक सण उत्सव विविध पद्धतीने पार पडतात. मग कधी त्यात अनेक प्राण्यांचा समावेश करण्यात येतो. सध्या बिहारमधील एका सणांच्या निमित्ताने काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीत हत्तीने धुमाकूळ घातला होता. मात्र या घटनेत पुढे काय घडले ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एका रस्त्यावर मिरवणुकीनिमित्ताने नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या मिरवणुकीत एक हत्ती आहे मात्र पुढे पाहिले तर दिसेल की नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने हत्ती धुमाकूळ घालण्यास सुरुवात करतो. त्यानंतर रस्त्यावर असलेली वाहने हत्ती खेळण्यातील वस्तू सारखी त्याच्या सोंडेने सर्वत्र फेकताना दिसून येत आहे. सर्व घटना( incident ) तेथील एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेली आहे.

सर्व घटना बिहारमधील असून घटनेचा व्हिडिओ ''इन्स्टाग्रामवरील'' ''@studentscolours'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्यानंतर कॅप्शनमध्ये,'' बिहारमधील छपरा येथे शनिवारी दसरा मिरवणुकीत एका हत्तीचा ताबा सुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि हत्तीने धिंगाणा घातला आणि बाजार परिसरात सुमारे दोन तास गोंधळ घातला आणि या प्रक्रियेत अनेक गाड्यांचे नुकसान केले.हत्तीने बसचे नुकसान केल्याचे व्हिडिओही आता समोर आले आहेत. या फुटेजमध्ये बाजारात मोठा हत्ती असून त्याच्या पाठीवर तीन लोक दिसत आहेत'', असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : मोदींच्या प्रचाराचा नारळ धुळ्यात का फुटला? फडणवीसांनी सांगितलं कारण | Marathi News

Winter Season: हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा

Maharashtra News Live Updates: गद्दार न केलेल्या कामाचा गवगवा करतात - उद्धव ठाकरे

Gita Jain : अपक्ष म्हणून धाकधूक नाही, पण तिकीट नाकारल्याची खंत; गीता जैन यांची सडेतोड टीका

Maharashtra Election : विरारमध्ये पैशांचा पाऊस; काल ७ कोटी आज २ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT