Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबईच्या ट्रेनमध्ये आली हवाईसुंदरी! व्हिडिओ बघून म्हणाल, अरे वाह जबरदस्त!

Mumbai Local Train: विमानातल्या हवाईसुंदरीनंतर लोकल ट्रेनमध्ये आता आली हवाईसुंदरी. नक्की कोण आहे ते व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Local Train Viral Video: सोशल मीडियावर कायम मुंबई लोकलमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग कधी महिलांचा राडा असतो तर कधी सणासुदीच्या दिवसात साजरा करण्यात येणाऱ्या प्रसंगाचे,त्यातच पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, मात्र त्यात चक्क हवाईसुंदरी दिसून येत आहे. नक्की ही हवाईसुंदरी कोण आहे त्यासाठी व्हायरल व्हिडिओ पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेन (Train)दिसत असून त्यातही महिलाचे कंपारर्मट दिसत आहे. व्हिडिओत व्हिडिओत तुम्ही पाहिले तर एक तृतीयपंथी आहे. तृतीयपंथी आणि ट्रेनमधील काही महिलामध्ये गमतीदार बोलणी सुरु असतात. अशातच जे तृतीयपंथी असतात ते दरवाजाच्या जवळ येतात आणि ज्या प्रमाणे विमानात हवाईसुंदरी बोलते त्या पद्धतीने त्या बोलू लागतात. यांचे बोलणे ट्रेनमध्ये बसलेल्या प्रत्येक महिलेला आवडत आहे. एवढेच नाही तर काहीजणी कॅमेऱ्यात सुद्धा कैद करत आहेत.

मुंबई लोकल ट्रेनमधील व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया व्हायरल होत असून ''mousomi9815'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''अशी सुंदर व्यक्ती'' असे लिहिण्यात आलेले आहे. सात दिवस व्हिडिओ पोस्ट करुन झाल्यानंतर हजारोच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी पाहिला आहे. एवढेच नाही तर अनेक प्रतिक्रियाही कमेटबॉक्समध्ये आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''आनंदी राहणे ही जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''खूपच छान'', अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणाला किती मिळणार गॅस सिलिंडर? टंचाई होणार दूर,वितरणासाठी राज्य सरकारचा नवा प्लॅन

दर्शनासाठी तासनतास रांग.., भुकेलेल्या साई भक्तांवर उपासमारीची वेळ; गॅस टंचाईमुळे प्रसादालयातून डाळ-भात वगळला|VIDEO

Maharashtra Live News Update : धुळ्यात वीज वितरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका बसला गहू उत्पादक शेतकऱ्याला

मुख्यमंत्र्यांच्या हॅलीपॅड कॅम्पसमध्ये अचानक बैल घुसला; हवालदार जीव मुठीत घेऊन धावला, नेमकं काय घडलं?

गॅस सिलिंडर तुटवड्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? VIDEO

SCROLL FOR NEXT