Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बैलाने दिली धडक, दुचाकीस्वार थेट ट्रकला धडकला, चालकामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा... Video

Bull Attack Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात एका बैलाने दुचाकीस्वारावर हल्ला केला आहे. बैलाने दुचाकीस्वाराच्या डोक्यावरुन उडी मारली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ डान्सचे, अपघाताचे आणि हाणामारीचे असतात. सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा अपघात दोन वाहनांमध्ये नाही तर बैल आणि बाईकस्वारामध्ये झाला आहे.

सध्या जंगल खूप जास्त प्रमाणात कमी झाली आहेत. त्यामुळे अनेक वन्यप्राणी, पाळीव प्राणी रस्त्यावर मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. अनेकदा वन्य प्राण्यांमुळे नागरिकांच्या जीवालादेखील धोका निर्माण होतो. असाच एक अपघात बैल आणि बाईकस्वारामध्ये झाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral Video Of Bull Attack)

व्हायरल व्हिडिओत रस्त्यावर एका बाजूने एक दुचाकीस्वार जाताना दिसत आहे. तर त्याच्याच बाजून एक ट्रक ड्रायव्हर भर वेगात येताना दिसत आहे. दुचाकीस्वाराला आपल्यासोबत काय घडणार आहे याचा जरादेखील अंदाज नव्हता. हा दुचाकीस्वार रस्त्याने जात असताना अचानक एका बाजूने एक बैल प्रचंड वेगात येतो. हा बैल या दुचाकीस्वाराच्या डोक्यावरुन उडी मारुन पळून जातो. अचानक बैल गेल्याने या दुचाकीस्वाराचा बाईकवरचा ताबा सुटतो आणि तो खाली पडतो.

दुचाकीस्वार जेव्हा खाली पडतो तेव्हा बाजूने ट्रक ड्रायव्हर येत असतो. ट्रक ड्रायव्हर भरधाव वेगात असतानाही त्याने प्रसंगावधान दाखवून ट्रक थांबवला. ट्रक थांबल्यामुळे या व्यक्तीचा थोडक्यात जीव बचावला. अन्यथा या व्यक्तीचा जीव गेला असतो. (Bull AttacK Video)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.@bangalore_premium या सोशल मिडिया हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ बंगळुरुमधील महालक्ष्मी लेआउटजवळचा आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी ट्रक चालकाने कौतुक केले आहे. (Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT