Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: कहरच! विजेच्या खांबावर चढून तरुणीचा डान्स; रीलसाठी जीव टाकला धोक्यात

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तरुणीने काही मिनिटांच्या रिल्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकला आहे. नक्की काय आहे व्हिडिओत पहा.

Tanvi Pol

Women Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात महिलेने रिल्सवर प्रसिद्ध होण्यासाठी चक्क विजेच्या खांबावर चढून डान्स केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला मोकळ्या मैदानात एक विजेचा खांब दिसत आहे. जर तुम्ही त्या खांबावर पाहिले असता एक महिला त्यावर चढली आहे. महिलेने फक्त त्यावर थांबलेली नाही तर त्यावर चढून डान्स करत आहे आणि व्हिडिओ तिथे असलेला एक व्यक्ती मोबाईलमध्ये शूट करत आहे. हा रिल व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''maheshpatel8819'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला शिवाय व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स नेटकऱ्यांनी या व्हिडिओला केल्या आहेत.

एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक कमेंटस आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''शॉक लागला असता तर'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे किती ती हिंमत'',अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT