Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काही केल्या चकल्या गोल होत नाहीत? भावाने सांगितलेली ट्रिक फॉलो करा - VIDEO

Diwali 2024: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा दिवाळी फराळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दिवाळीच्या सोप्या ट्रिक्स तरुणाने सांगितल्या आहे.

Tanvi Pol

Young Man Viral Video: महाराष्ट्रासह सर्वत्र दिवाळीची धामधुम पाहण्यास मिळत आहे. मग घराघरात फराळापासून ते सजावट करण्याचा उत्साह प्रत्येकामध्ये आहे. लहान मुलं आपल्या घरातील मोठ्या सदस्यांना प्रत्येक कामात मदत करताना दिसून येत आहे. मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीतील चमचमीत फराळ. फराळ करताना महिलांची मोठी कसरत होत असते, मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका तरुणाने दिवाळीतील चकली करण्याती अगदी सोपी पद्धत सांगितली आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत एक तरुण घरातील सोफ्यावर बसलेला आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर घरातील सोफ्यावर बसून चकली करताना दिसत आहे. जर तुम्ही पाहिले तर चकली करण्याची अनोखी पद्धत तरुणाने व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहे. शिवाय तरुण दिवाळीचा फराळ करत आहे ते पाहून सध्या या व्हिडिओला (Video) नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@TanviPol116027'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मोठ्या संख्येने व्हिडिओला लाईक्स आणि कमेट्स केलेल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या दिवाळीनिमित्ताने अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghee Benefits: तूप खाल्लं तर येईल रुप! जाणून घ्या फायदे

Fraud Case : बनावट कागदपत्रांसह कार विकली; तरुणाची ५ लाखात फसवणूक

Congress News : मविआमध्ये कॉंग्रेसची नमती भूमिका, काही जागांवर घेणार माघार ?

Maharashtra News Live Updates: अक्कलकुवा अक्राणी मतदार संघातील 7 उमेदवारी अर्ज बाद

Diwali 2024 : दिवाळीला दिवे लावताना त्यांच्या खाली ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल सुख-समृद्धी आणि पैसा

SCROLL FOR NEXT