Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आधी मान धरली, मग खाली पाडला, दोघांनी लाथांनी तुडवला, पुण्यात भररस्त्यावर मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Fighting Video: सोलापूर महामार्गाच्या बाजूला झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात काही व्यक्तींची जोरदार मारामारी पाहण्यासाठी मिळत असून नेमके कारण काय ते एकदा पहा.

Tanvi Pol

Viral Video: सध्या पुणे जिल्ह्यातील एका हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या घटनेत किरकोळ कारणावरून आपआपसात शिवीगाळ, भांडणे करून एकमेकांना दगडाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमके काय घडले?

दिनांक २४ मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलच्या समोर सार्वजनिक ठिकाणी चार व्यक्ती किरकोळ कारणावरून भांडणे करीत होते. यावेळी किरकोळ बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत होऊन एकमेकांशी पुणे - सोलापूर महामार्गाच्या बाजूला भांडणे(Fight) करीत हाताने मारहाण करून व शिवीगाळ दमदाटी केली. दरम्यान, आरडाओरडा करून सार्वजिनक शांतता भंग केल्याप्रकरणी चौघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक महामार्ग दिसत आहे. रस्त्यावरुन अनेक लहान-मोठ्या वाहनांची ये-जा होताना दिसून येत आहे. त्यातच व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की चार व्यक्तींंमध्ये अगदी रस्त्याच्या कडेला जोरदार हाणामारी होत आहे. रस्त्यावरुन जाणारे यांच्याकडे पाहत आहे मात्र एकही जणांनी ही हाणामारी थांबवण्याचे धाडस केले नसून संपूर्ण व्हिडिओ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

हाणामारीचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या 'SaamTvNews' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला असून व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,'' पुणे- सोलापूर महामार्गावर चौघांची मारामारी, पोलिसांनी गुन्हा दाखल केला'', असे नेमके काय घडले व्हिडिओत ते सांगितले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया यूजर्संनी दिलेल्या आहेत.

टीप : हाणामारीचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळ निवडणुकीत नवा ट्विस्ट, 492 संस्थांच्या पात्रतेला सुप्रीम कोर्टात आव्हान

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खलबतं सुरू

BRICS साठी 2 डझन देश एकत्र; भारताच्या नेतृत्वात झाले 5 मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उद्या दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद

Marathi Actress: गाडी अडवली, पैसे मागितले अन् मारहाण केली...; 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीसोबत पुण्यात धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT