Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'जलवा है हमारा..' डॉली चायवाल्याची प्रायव्हेट जेटमधून सफर, स्वॅग अन् रुबाब पाहून नेटकरी हैराण; VIDEO

Dolly Chaiwala Viral Video: डॉली चायवाला हा व्यक्ती कायमच सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. सध्या पुन्हा एकदा डॉली चायवालाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्यक्तींना कमी वेळात मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. यामधला एक व्यक्ती अर्थात डॉली चायवाला. गेल्या अनेक महिन्यापासून डॉली चायवाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेसम झाला. बिल गेट्स सुद्धा डॉली चायवालाच्या भेटीस आले होते, त्यानंतर डॉली चायवाला मोठ्या प्रमाणात फेमस झाला, मात्र सोशल मीडियावर पुन्हा एकदा डॉली चायवालाची चर्चा होत आहे. ज्यात डॉली चायवाला चक्क प्रायव्हेट जेटमध्ये बसून माउंट एव्हरेस्ट आणि हिमालयाचे सौदर्य पाहण्यासाठी गेलेला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये(Video) तुम्हाला एक मोठे विमानतळ दिसून येत आहे. या विमानतळावर डॉली चायवाला एक शानदार एन्ट्री घेताना दिसून येतोय. डॉली चायवालाच्या एका बाजूवरुन जेट येताना दिसून येतेय मात्र काही वेळातच डॉली चायवालाच्या बाजूला एक व्यक्ती येतो आणि त्याच्या खांद्यावर हात टाकून दोघही जेटच्या जवळ जाताना दिसून येत आहेत. जेट जवळ जाताच जेटचे कर्मचारी डॉली चायवाला (Dolly Ki Tapri)आणि त्याच्या सोबत असलेल्या दोघांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करतात. त्यानंतर ते दोघही जेटच्या आतमध्ये जातात. जेटमध्ये गेल्यानंतर काही वेळात माउंट एवरेस्टचे सौदर्य व्हिडिओत दिसते. व्हिडिओच्या शेवटी दोघही जेटमधून उतरताना आपल्याला दिसून येतात.

प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे, मात्र तो इन्स्टाग्रामवरील ''@dolly_ki_tapri_nagpur'' या अकाउंटवर खुद्द डॉली चायवाला यानेच व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने कमेंट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की,'' काय राव याचे नशीब'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' देवा'' अशा अनेक प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT