Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: OMG! कूलरमध्ये ८ फूट साप दबा धरुन बसला, घरातल्यांना पळती भुई थोडी, व्हिडीओ व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या घरात साप आढळल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुढे काय झाले ते व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Snake Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम अनेक प्राण्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. कधी प्राण्यांचे गमतीदार व्हिडिओ असतात तर कधी अंगावर शहारा आणणारे. सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर असाच भितीदायक सापा संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओत एका घरात वापरल्या जाणाऱ्या कुलरमध्ये भलामोठा साप आढळून आलेला आहे. सध्या या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा आलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका घरातील एक खोली दिसत आहे. या घरातील खोलीमध्ये एक सफेद रंगांचा कुलर कोपऱ्यात ठेवलेला आहे. मात्र या कुलरच्या समोर एक व्यक्ती उभा आहे, मात्र व्हिडिओत तुम्ही पुढे पाहिले तर दिसेल की, एक व्यक्ती चक्क त्या कुलरमधून भलामोठा साप (Snake)काढताना दिसत आहे. काही वेळानंतर तो व्यक्ती कुलरमधून साप काढण्यात पूर्णपणे यशस्वी होतो आणि त्याच्या हातात न घाबरता साप काही वेळ पकडून ठेवतो. सर्व घटना घरातील एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे शिवाय लाखोंच्या संख्येने व्हिडिओला यूजर्संचे व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की, ''बाबो जाम खतरनाक आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''न घाबरता याने पकडले आहे'' तर अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना,VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस

रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल; इराणने अमेरिका-इस्रायलविरुद्ध दम भरला|VIDEO

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

SCROLL FOR NEXT