Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लोकलमध्ये तरुणींचा राडा! एकमेंकीच्या झिंझ्या पकडत तूफान तुडवले; हाणामारीचा VIDEO व्हायरल

Mumbai Local Viral Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकल ट्रेनमधील घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Women Fighting Video: मुबंई उपनगरात राहणाऱ्यापासून ते प्रत्येक मुंबईकर दररोज लोकल ट्रेनचा प्रवास करत असतो. लोकल ट्रेनचा प्रवास करणे आता वाढत्या गर्दीमुळे अत्यंत जोखमीचे काम झालेले आहे. अनेकदा या गर्दीमुळे काही प्रवाशांना जीव गमवावा लागतो तर अनेकांना यात गर्दीमुळे ट्रेनमध्ये भांडण करावे लागते. त्यात अनेकदा हे वाद टोकाला जातात. सध्या या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात लोकल ट्रेनमध्ये काही तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे. नक्की काय कारण असेल या हाणामारीचे पाहूयात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, लोकल ट्रेन(Local Train)मधील महिलांचा कम्पार्टमेंट दिसून येत आहे. या कम्पार्टमेंटमध्ये महिला प्रवाशाची मोठी गर्दी आहे. मात्र काही वेळात या महिलांमधील काही तरुणीमध्ये जोरदार हाणामारी (Fighting)होत आहे. यात एका तरुणीला अन् दोन तरुणी मारत आहेत. व्हिडिओत तरुणींचा हाणामारी पाहून अन् महिला प्रवाशी त्यांना थांबवण्याच प्रयत्न करत आहेत मात्र काही केल्या त्या ऐकत नाही. त्यातील एका महिलेने संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून एक्सवरील ''@RoadsOfMumbai'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठल्या स्टेशन दरम्यानचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या चर्चेत आलेला आहे.

महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले की,''नेहमीच आहे हे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''कारणच पाहिजे या महिलांना'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''कारण तरी सांगा हाणामारीचे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्याागे ७७०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धांतील मृत सैनिकांचा सन्मान कसा केला जात असे?

Box Office Collection: 'धुरंधर'ने मारली बाजी, केलं कोट्यवधींच कलेक्शन; जाणून घ्या कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची कमाई

Gajkesari Rajog 2026: 2 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 12 वर्षांनी बनणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग

SCROLL FOR NEXT