Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रवाशांमध्ये तुफान राडा! रेल्वे प्लॅटफॉर्मवरच एकमेंकाना धु-धु धुतले; VIRAL व्हिडीओने उडवला धुरळा

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या एका रेल्वे स्टेशनवर झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रवाशांमध्ये झालेल्या या हाणामारीचे नेमके कारण काय हे एकदा पहा.

Tanvi Pol

Viral News: सोशल मीडियावर सध्या काही प्रवाशांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात प्रवाशांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवरच एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर तुम्हाला याआधी लोकलमधीलच व्हिडिओ पाहण्यास मिळाले होते,मात्र या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक रेल्वे(Railway) स्टेशन दिसून येत आहे. त्यात रात्रीची वेळ असून रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची जास्त गर्दी नाही, मात्र याच काही तरुण प्रवासी आहे, ज्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. ते एकमेंकाना मिळेल ती वस्तू घेऊन मारत आहे. सर्व व्हिडिओ दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद करुन व्हायरल केला आहे.

हाणामारीचा व्हिडिओ कांदिवली या रेल्वे स्टेशनचा असल्याचे समजते मात्र खात्री होऊ शकलेली नाही, मात्र हा व्हिडिओ सध्या ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेला असून ''mumbai.hai.bhai'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन १ दिवस होताच नेटकऱ्यांनी अनेक लाईक्स तर अनेक व्ह्यूज मिळत आहेत.

एवढेच नाही तर हाणामारीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लोकलमध्ये कायम होत असलेल्या हाणामारीचे व्हिडिओ आठवले त्यात त्यांनी तरुणांची हाणामारी पाहून अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील काहींनी ''हाणामारीचे नेमके कारण काय?'' हे विचारले आहे तर काहींनी ''कायमच हे असते'', असे सांगितले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT