Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काय सांगता! सोलापुरात दिसला दूध पिणारा कोंबडा; VIDEO पाहून लोक थक्क

Viral News: सोशल मीडियावर सध्या नेटकऱ्यांनी दूध पिणाऱ्या कोंबड्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहे. मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण होत असून विचारात पडलेला आहे.

Tanvi Pol

Solapur Cock Video: जगभरातून अनेक विचित्र घटना समोर येत असतात. कधी या घटनेचे व्हिडिओ पाहून स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसत नाही तर अनेकदा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण होतो. त्यातच सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, ज्या व्हिडिओत तुम्हाला चक्क दुध पिणारा कोंबडा दिसून येईल. नक्की व्हिडिओ कुठला आहे हे एकदा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल.

व्हिडिओत खास तरी काय?

सोलापुराच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा(Cock) आढळून आलाय.'राजा' असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचे नाव असून वनराज क्रॉस जातीचा हा कोंबडा आहे. ज्या पद्धतीने एखाद्या पैलवानला खुराक दिली जाते अगदी तशाच पद्धतीची या राजा नावाच्या कोंबड्याची खुराक आहे.

हा कोंबडा दररोज सकाळी मका भरडा आणि भुसा खातो तर दुपारी तांदूळ, गहू, बाजरी खातो आणि रात्रीच्या वेळेस भुसा तसेच १०० मिली दूध पितो. या कोंबड्याचे तब्बल ६ किलो वजन असून १२ महिने याच वय आहे.

सोलापुरमधील व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे, त्यातील तो व्हिडिओ तुम्हाला ''saamtvnews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,'': सोलापुराच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा,राजा अस या दूध पिणाऱ्या कोंबड्याचे नाव'',असे लिहिण्यात आलेले आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला असून त्यावर नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. पहिल्या एका यूजरने लिहिले आहे की,''आमचा कडे दारू पिणारा कोंबडा आला आहे'', तर अशा अनेक प्रतिक्रिया येत आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक लाईक्स मिळाले असून व्ह्यूजही व्हिडिओला येत आहेत.

टीप : सोलापूरमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blast Blast: भारताच्या शेजारील देशात पोलीस ठाण्यावर हल्ला, १३ जणांचा जागीच मृत्यू

Diva Travel : 'दिव्या'जवळील ७ विरंगुळ्याची ठिकाणे, शहराच्या गोंगाटापासून दूर प्लान करा वन डे ट्रिप

Vastu Shastra : तुमच्या किचनचा ओटा कोणत्या रंगाचा? वास्तू शास्त्रानुसार 'हे' रंग आहेत शुभ

Rain Update : विजांसह मुसळधार पाऊस, कोकणासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: कर्ज आणि मुलीच्या उपचाराच्या चिंतेने शेतकऱ्याने संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT