Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रिलचा नाद लय बेक्कार! चक्क रेल्वे ट्रॅकवर झोपला, त्यानंतर जे झालं ते धक्कादायकच; VIDEO व्हायरल

Viral Video Of Stunt: लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करतात. परंतु एका मुलाने हद्दच पार केली आहे. रिल बनवण्यासाठी तो ट्रेनच्या पटरीवर झोपलेला दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेकजण रिल्स बनवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडयावर व्हायरल होत आहे.त्यात एक मुलगा रील बनवण्यासाठी चक्क ट्रेनच्या पटरीवर झोपला आहे. त्या मुलाच्या अंगावरुन ट्रेन जाताना दिसत आहे. परंतु तरीही त्या मुलाला काहीच होत नाही. (Viral video)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक मुलगा रिल बनवताना दिसत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी त्याने अनोखा स्टंट केला आहे. तो चक्क ट्रेनच्या पटरीवर झोपला आहे. त्याच्यावरुन एक ट्रेनदेखील गेली. परंतु हा मुलगा ट्रेनच्या पटरीवर पूर्ण झोपला असल्याने त्याला काही त्रास झाला नाही. त्याला कुठेच लागले नाही. परंतु रिल बनवण्यासाठी हा अनोखा स्टंट करणे जिवावर बेतू शकते. (Viral Video OF Reels Stunt)

UpdateIndiatv या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणताही मार्ग अवलंबतात. यामुळे एखादा स्टंट जीवावर बेतू शकतो. त्यामुळे काहीही करताना विचारपूर्वक करा. अन्यथा तुमच्या जीवावर बेतू शकते. (Stunt For Reels)

याआधीही सोशल मी़डियावर रिल्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. चार मुलांच्या ग्रुपने तर भरधाव येणाऱ्या ट्रेनच्या समोर येऊन व्हिडिओ काढला होता. हा स्टंट त्यांच्या जीवावर बेतला होता. त्यातील एका मुलाला गंभीर लागले होते.

याआधीही रिलस्टार अन्वी कामदार हिचा रिल बनवताना मृत्यू झाला होता. ती ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर होती. पावसाळ्यात व्हिडिओ काढण्यासाठी दरीच्या जवळ गेली. तिथे पाय घसरुन ती खाली खोल दरीत कोसळली होती. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT