Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वा रे माझ्या वाघा! ७ वर्षांच्या मुलानं एकदम गोल गोल भाकरी बनवली, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल लय भारी

Viral News: एका चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात त्याने चक्क भाकरी केली आहे. कमी वयात योग्य पद्दतीने केली जाणारी कला पाहून या चिमुकल्याचे कौतुक होत आहे, तुम्हीही एकदा व्हिडिओ पहा.

Tanvi Pol

Little Boy Video: उत्तम स्वयंपाक येणं ही एक कला आहे, जी प्रत्येकाला चांगली जमत नाही. मुलींना लहानपणापासून सांगितले जाते जेवण येणे अत्यंत महत्त्वाचे असते, त्यात त्यांना अनेकदा स्वयंपाक घरात बोलावून काही काही पदार्थ लहानपणापासून बनवण्यास शिकवले जातात, मात्र सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने अतिशय सुंदर आणि योग्य पद्धतीने भाकरी थापली आहे. व्हिडिओ पाहून सध्या प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक चिमुकला किचनमध्ये बसलेला दिसत आहे, काही वेळानंतर चिमुकला जमिनीवर बसतो आणि समोर परात आणि भाकरी करण्याचे साहित्य घेतो काही वेळानंतर योग्य पद्धतीने भाकरी थापण्यास सुरुवात करतो. चिमुकल्याच्या शेजारी असलेल्या महिलेने परात एका बाजूने पकडली आहे मात्र चिमुकला त्याच्या नादात भाकरी करण्यात दंग झालेला दिसत आहे. घरातील एका सदस्याने संपूर्ण व्हिडिओ (Video)कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

''इन्स्टाग्रामवर'' व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, मात्र तो व्हिडिओ ''sneha_l4912'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत त्याच यूजरने कॅप्शनमध्ये,''आजची मुलं जिथे मोबाईलच्या आहारी जात आहे. तिथे हा माझ्या मामाचा मुलगा . इयत्ता दुसरीत शिकतो,त्याला भाकरी बनवताना बघून मलाही कौतुक वाटले माझ्याप्रमाणे तुम्ही ही त्याचे कौतुक करावे म्हणून हा व्हिडिओ शेअर केला'',असे कॅप्शनमध्ये सांगण्यात आलेले आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात यूजर्संनी कौतुकास्पद प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''मुलींना पण लाजवशिल् अशी भाकरी बनवलीस रे बाळा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''हे शिक्षण पण गरजेचं आहे'', ''खूप सुंदर'' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत.

टीप : चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT