Accident Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Accident Viral Video: ठाणे- बेलापूर मार्गावर विचित्र अपघात; चार गाड्या एकमेंकाना धडकल्या

Thane–Belapur Video: सोशल मीडियावर सध्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या घटनेत विचित्र अपघात घडला आहे.

Tanvi Pol

Shocking Video: सध्या सोशल मीडियावर एका विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चार गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. सकाळी झालेल्या या अपघातामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली होती. मात्र सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होऊन पाहिला जात आहे.

अपघात घडला तरी कसा?

पुढील गाडीने अचानक ब्रेक मारल्याने एकामागोमाग एक अशा चार गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झालाय. या अपघाता मुळे ठाणे (Thane)बेलापूर मार्गावर कोपरखैरणे जवळ मोठी वाहतूक कोंडी झालेय. सर्व अपघाताची घटना तिथे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद करुन सोशल मीडियावर व्हायरल(Viral) केलेली आहे.

ऐन सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी मध्ये अडकल्याने कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत असून वाहतूक पोलीस वाहतूक नियत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्रात कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना या अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. पोलिसांकडून चारही वाहने रस्त्याच्या कडेला आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून 'SaamTvNews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन,''Thane–Belapur मार्गावर 4 गाड्यांचा विचित्र अपघात'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT