Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: पिल्लाला वाचवण्यासाठी अस्वलाशी धडपड, थेट वाघाशी भिडली; चंद्रपूर अभयारण्यातील थरारक VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून भल्याभल्या नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाघ, सिंह यांचा थरारक प्राण्यांचे नाव ऐकताच आपल्यापैंकी प्रत्येकाला भिती वाटते. सोशल मीडियावर आपण पाहतो की वाघ किंवा सिंह असेल यांच्या तावडीत आलेला प्रत्येक प्राणी असो वा मनु्ष्याला जीव गमवावा लागतो, मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये अस्वलच चक्क वाघावर भारी पडलेले आहे. नक्की काय घडले हे तुम्ही व्हायरल व्हिडिओत पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ संपूर्ण दाट जगलाचा परिसर दिसून येत आहे. यातच एक वाघ जंगलात असलेल्या अस्वलाच्या लहान पिलांना पाहतो आणि त्यांच्या शिकारीसाठी धावतो. मात्र तितक्याच अस्वलांची आई तिथे येते आणि त्यांच्या मदतीसाठी धावून जाते. त्यामुळे ती वाघावर हल्ला(attack) करताना दिसून येत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता मादा अस्वल वाघावर हल्ला करतो मात्र वाघही अस्वलावर हल्ला करत असतो काही वेळ दोघांमध्ये लढत सुरु असते. मात्र शेवटी अस्वल वाघावर भारी पडतो त्यामुळे वाघ तिथून पळ काढताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील '@saamtv' वर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ साधारण काही तासांतच व्हिडिओला तब्बल हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले आहे तर अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'कारण ती एक आई आहे ह्या दूनियाची सर्वात मोठी योद्धा आहे ' असे तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'आई' अनेकांनी अशाच प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT