Viral VIdeo  Saam TV
व्हायरल न्यूज

Tree Falling Viral Video : मृत्यू काही अंतरावर थांबला, 4 सेकंदाचा VIDEO काळजाचा ठोका चुकवेल

Viral Video News : जर हा तरूण काही क्षणात बाजूला सरकला नसता तर त्याचा मृत्यू अटळ होता.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : मृत्यू कुणाला कधी आणि कुठे गाठेल याचा काही नेम नाही. काहींचं नशीब इतकं बलवत्तर असतं की ते मृत्यूलाही चकवा देतात. असाच एक व्हिडीओ सध्या  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवघ्या चार सेकंदांचा हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे.

ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या एखाद्या रनरला सेकंदाचं महत्त्व चांगलंच कळतं. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील व्यक्तीलाही ते महत्त्व चांगलंच कळलं असेल. व्हिडीओमध्ये उभा असलेल्या तरूणाच्या अंगावर झाडाची फांदी पडताना दिसत आहे. जर हा तरूण काही क्षणात बाजूला सरकला नसता तर त्याचा मृत्यू अटळ होता.

पाऊस सुरु असल्याने हा व्हिडीओतील व्यक्ती छत्री घेऊन उभा होता. अचानक झाडाच्या फांदीचा आवाज होतो. तेव्हा हा व्यक्ती लांब पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र पळायच्या आधीच तो तोल जाऊन खाली पडतो. खाली पडल्यानंतर काही इंचांच्या अंतरावर झाडाची फांदी पडते. (Latest News Update)

झाडाची फांदी प्रचंड वेगात, एखाद्या बाणासारखी सरळ जमिनीवर पडते. मात्र ही फांदी या व्यक्तीच्या अंगावर पडली असती तर कदाचित या व्यक्तीचा मृत्यूही झाला असता. थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT