Moye Moye Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Moye Moye Viral Video: चोरांना पाहून बॉयफ्रेंडने ठोकली धूम; गर्लफ्रेंडसोबत चोरट्यांनी काय केलं? पाहा VIDEO

Theft Video: तिच्या प्रियकराने घाबरून धूम ठोकल्याने चोरट्यांना याचा राग येतो आणि तरुणीची फार दया येते. कठीण प्रसंगात आपल्या प्रेयसीची साथ या तरुणाने सोडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video News:

चोरीच्या अनेक घटना आजवर तुम्ही पहिल्या असतील. अगदी गरिबाच्या घरातही चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. चोरी आणि लुटमार करतानाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील चोरांचं कौतुक कराल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण आणि तरुणी एकत्र रस्त्याने जात आहेत. अचानक वाटेत दोन जण डोक्यात हेल्मेट घालून दुचाकीवरून जाताना दिसतात. काही वेळाने ते दुचाकी थांबवतात आणि तरुण तसेच तरुणीच्या हातातील बॅग चोरण्याचा प्रयत्न करतात. यावेळी प्रियकर प्रेयसीच्या मागे लपतो. चोरटे त्याच्या हातातली बॅग हिसकावतात. तेव्हा तो देखील त्यांना विरोध न करता घाबरून बॅग देतो.

त्यानंतर चोर तरुणीच्या हातातील बॅग देखील खेचून पळू लागतात. त्यावेळी चोरट्यांना घाबरून प्रियकर मागच्या मागे पळून जातो. तरुणी एकटीच असते. अशात तिच्या प्रियकराने घाबरून धूम ठोकल्याने चोरट्यांना याचा राग येतो आणि तरुणीची फार दया येते. कठीण प्रसंगात आपल्या प्रेयसीची साथ या तरुणाने सोडली आहे.

त्याला पाहून चोरटे पुन्हा दुचाकीवरून खाली उतरतात. ते तरुणीला चोरलेली बॅग परत करतात. यावेळी तरुणाची बॅग देखील ते तिला परत करतात. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल झाला आहे. top.man_5 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक लाइक्स आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT