Fish Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Fish Viral Video: बापरे! मोठे ओठ अन् भलामोठा चेहरा; पाण्यात फिरतोय अनोखा लिप फिश, पाहा VIDEO

lips Fish: अजूनही अनेक रहस्यमयी गोष्टींजवळ माणूस पोहचू शकलेला नाही.

Ruchika Jadhav

Viral Video: समुद्राच्या पाण्यात विविध प्रकारचे मासे आहेत. हा समुद्र इतका विशाल आणि खोल आहे की, त्यात असेल्या आनेक जीवांची आपल्याला अद्याप माहिती देखील नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान सध्या फार पुढे गेले आहे. मानवाने तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक शोध लावलेत. मात्र अजूनही अनेक रहस्यमयी गोष्टींजवळ माणूस पोहचू शकलेला नाही. (Latest Viral Video)

पृथ्वीसह समुद्रात देखील अनेक अदभूत आणि सुंदर असे जीव आहेत. यांचे अनेक व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये एक सुंदर मासा पाण्यात पोहताना दिसत आहे. इतर माश्यांपेक्षा हा फार अनोखा आणि वेगळा आहे. आजवर तुम्ही डॉल्फीन, शार्क, देव मासा आणि समुद्रातील खाता येतील असे सुर्मयी, पापलेट, बांगडा अशा माशांची नावे ऐकली असतील.

या सर्व माशांचे तोंड वेगवेगळे असते. मात्र माणसाच्या ओठाप्रमाणे ओठ असेलेला मासा तुम्ही पाहिलायत का? सोशल मीडियावर अगदीच माणसाच्या ओठाप्रमाणे ओठ असलेला मासा व्हायरल झाला आहे.

माश्याला जाड ओठ असल्याने त्याला जर्मनीत लीप फिश असंही म्हटलं जातं. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक स्कूबा डायव्हर पाण्यात पोहत आहे. यावेळी लीप फिश त्याच्या शेजारीच उभा होता. स्कूबा डायव्हर यावेळी हातात हातोडी घेऊन काहीतरी फोडण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा मासा त्याच्याकडे एकटक पाहत होता.

अशात हातातली गोष्ट फोडल्यावर मासा व्यक्तीच्या भोवती फिरतो आणि तो गोष्ट खाऊन घेतो. @TansuYegen या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. काही तासांतच व्हिडिओवर ६ दशलक्षहून अधिक व्ह्यूव्ज आलेत. तसेच ३८ हजारांहून जास्त लाईक्स यावर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT