Mahindra Thar video Saam Tv
व्हायरल न्यूज

Farmer Thar Viral Video : भावा तुझीच हवा, नांगराला जुंपली 20 लाखांची थार अन् भुसभुशीत केलं शिवार

Pune Farmer News : अनिल मधुकर तोंडे असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

Baramati News : आजवर तुम्ही रॉयल शेतकरी, ब्रॅण्ड शेतकरी ऐकलं असेल. पण तो कसा असतो हे आज पाहूनही घ्या. एका शेतकऱ्यांनं बैलांना आराम देऊन चक्क 20 लाखांची थार नांगराला जुंपली.

थार गाडीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकर गावातील हा व्हिडीओ आहे. यामध्ये शेतकऱ्याने चक्क थार गाडीच्या मदतीने आपली शेती नांगरली आहे. अनिल मधुकर तोंडे असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे. त्याने स्वतःच्या शेतातील नांगरणीसाठी या गाडीचा उपयोग केल्याने ते चर्चेचा विषय ठरत आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अनिल तोंडे यांनी गाडीच्या मागच्या बाजूला बैलांच्या मदतीने नांगर दाव्याच्या सहाय्याने जोडला आहे. तर गाडीच्या टपावर आपल्या लेकाला बसवलंय. थार गाडीने मदतीने त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल एक एकर क्षेत्र नांगरलं आहे. या दणकट गाडीच्या साहायाने आपण नांगरणी करून पाहूया असा विचार आला अन् तो थेट कृतीतही उतरवला असं अनिल यांनी सांगितलं. (Viral Video)

ट्रॅक्टरच्या तुलनेत थार गाडीने नांगरणी करण्यास अधिकचा खर्च आला. परंतु गाडीची कार्यक्षमता पडताळले असता गाडी दणकट असून यामुळे गाडीवरचा विश्वास आणखी वाढल्याचं अनिल तोंडे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT