Trending Video News 
व्हायरल न्यूज

Viral Video : धोतर नेसून आजोबाने बॅटने फटका मारला अन्..., नेटकऱ्यांनी उडवली धोनीची खिल्ली

Viral Video : सोशल मीडियावर एका आजोबाचा फलंदाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्याने आजोबाच्या फलंदाजीला धोनीसोबत जोडलेय. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Trending Video News : आरसीबीविरोधात चेन्नईचा ५० धावांनी पराभव झाला. या सामन्यात धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, त्यावेळी आरसीबीने सामना जवळपास जिंकलाच होता. नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला धोनी सोशल मीडियावर ट्रोल झाला. धोनीला ट्रोल करण्यासाठी एका व्यक्तीने आजोबाचा व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. आजोबा जोरदार फटका मारतात अन् दोन धावा काढत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. एक्स युजर्सने आजोबाचा व्हिडिओ पोस्ट करताना धोनी अखेरच्या षटकात ७५ धावा हव्या असताना फलंदाजी करताना असे मजेदार कॅप्शन लिहिलेय. शेवटच्या षटकात धोनी ज्या पद्धतीने शानदार फलंदाजी करतो, त्याचं वर्णन करणारा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय.

क्रिकेट खेळणाऱ्याला वयाचे बंधन नसते, हे धोनीने आरसीबी आणि मुंबईविरोधातील सामन्यात दाखवून दिलेय. विकटकिपिंग असो की फलंदाजी, धोनीने ४२ व्या वर्षीही आपली छाप सोडली. आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्यानंतर एक्स युजर्सने व्हिडिओ पोस्ट केलाय. त्या व्हिडिओ वयोवृद्ध व्यक्ती क्रिकेट खेळताना दिसतोय. उपस्थित लोक त्या आजोबाला दादाजी म्हणतात.. धोतर, हातात बॅट अन् उत्साह पाहून नेटकरी खूश झालेत.Viral Video

धोतर नेसून आजोबांची फटकेबाजी -

धोतर नेसून आजोबा शानदार फलंदाजी करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. चेंडू जोरदार टोलवल्यानंतर आजोबा उत्साहात दोन धावा घेतात. त्या आजोबाची फलंदाजी आणि उत्साह पाहून अनेकजण हैराण झाले. आजोबांच्या रक्तात क्रिकेट आहे, अशी कमेंट एका युजर्सने केली आहे. आजोबाच्या फलंदाजीची स्टाइल, चेंडू फटकावल्यानंतरचा उत्साह पाहून नेटकरी खूश झालेत. आजोबाची फलंदाजी पाहून अनेकांना धोनी आठवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT