fact check news saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: तुमच्या जेली चॉकलेटमध्ये रबर? जेलीतील रबरमुळे मुलं पडतात आजारी? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Viral Jelly Video Fact-Check: तुमची मुलं जर जेली चॉकलेट खात असतील तर वेळीच सावध व्हा...कारण, आज आम्ही जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल...जेलीत रबर असल्याचा दावा करण्यात आलाय...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसला असेल...लहानग्यांना आवडणाऱ्या जेलीत चक्क रबरासारखा पदार्थ असल्याचं दिसतंय...आणि हे जेली चॉकलेट मुलं आवडीने खातात...या व्हिडिओत जे दिसतंय ते गंभीर आहे...

हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा...या व्यक्तीने ही जेली एका कपड्यात घेऊन पिळून काढली...त्यावेळी जेलीतील सर्व पदार्थ निघून गेला आणि कापडामध्ये फक्त रबरासारखा पदार्थ राहिला...हे दिसतंय तो खरंच रबर आहे का...? जेलीमध्ये चिकट पदार्थ रबर असतो का...? या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...कारण, लहान मुलं ही जेली आवडीने खात असतात...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...आमच्या टीमने व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला...याबाबत तज्ज्ञ माहिती देऊ शकतात...आम्ही तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांना व्हिडिओ दाखवला...

जेलीमध्ये जिलेटीन सारखा एक पदार्थ असतो

जिलेटीन सारखा पदार्थ लहान मुलांसाठी हानिकारक

अॅसिडीटीमुळे पोटात जळजळ होऊ शकते

या जेलीत काय कंटेंट आहे हे समजून घेतलं पाहिजे

सर्वच चॉकलेट, जेलीत घातक पदार्थ नसतात

तरीही चॉकलेट खाताना काळजी घ्यायला हवी

मात्र, अशा प्रकारे जेली खाल्ली आणि त्यात रबरसारखा पदार्थ असल्याच लिव्हरला त्रास होऊ शकतो...कॅन्सरचाही धोका निर्माण होण्याची भीती आहे...या व्हिडिओतील जेलीत नक्की काय आहे हे कळू शकलेलं नाही...तरी तुम्ही मुलांना अशा वस्तूंपासून दूर ठेवले पाहिजे असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT