Viral video claims government may freeze bank deposits in April, but fact-check reveals the truth behind the rumor Saam Tv
व्हायरल न्यूज

एप्रिलमध्ये तुमचं बँक खातं फ्रीज होणार? आर्थिक संकटामुळे सरकार तुमचे पैसे गोठवणार?

Fact Check: आम्ही व्हायरल व्हिडिओंची पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यात दावा केलाय की एप्रिल महिन्यात सरकार तुमचे बँकेतील पैसे गोठवणार आहे...पण, खरंच देशावर संकट आलंय का...? या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

..ऐकलात...या व्हिडिओत सांगितलंय की बँकेतून सगळे पैसे काढून घ्या...एप्रिल, मे महिन्यात देशावर आर्थिक संकट येईल आणि सरकार तुमचे पैसे गोठवू शकतं असा दावा केलाय...एप्रिल-मेमध्ये युद्धामुळे आर्थिक संकट येऊ शकतं असा दावा केल्याने खळबळ उडालीय...पण, देशावर आर्थिक संकट आल्यास सरकार बँकांमधील पैसे गोठवू शकतं का...? आपले पैसे रोखून ठेवण्याचा अधिकार सरकारला आहे का...?

हा विषय प्रत्येकाच्या जीवाळ्याचा आहे...बँकातील पैसेच जर सरकारने गोठवले तर व्यवहार करायचे कसे...? पैसे घरी ठेवणंही सुरक्षित नसतं...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत कुठे रिझर्व्ह बँकेनं माहिती दिलीय का...? हे तपासून पाहिलं...मात्र, कुठेही माहिती मिळाली नाही...मग आम्ही बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांची भेट घेऊन अधिक माहिती घेतली...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय पाहुयात...

व्हायरल व्हिडिओत खोडसाळपणा करण्यात आलाय

रिझर्व्ह बँक कधीही कोणाचे पैसे फ्रीज करू शकत नाही

रिझर्व्ह बँक ही स्वायत्त संस्था, सरकारची संस्था नाही

सरकार पैसे काढून घेईल म्हणणं चुकीचं

बँकांच्या बाबतीत सरकार हस्तक्षेप करू शकत नाही

...सध्या युद्धामुळे गॅस, तेल टंचाई जाणवतेय...त्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल करून लोकांना घाबरवलं जातंय...काहीजण असे व्हिडिओ पाहून विश्वास ठेवतात...त्यामुळे असा खोडसाळपणा केला जातो...मात्र, तुमचे पैसे सरकार गोठवू शकत नाही...आमच्या पडताळणीत एप्रिलमध्ये तुमचं बँक खातं फ्रीज होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्या माशांवर केमिकल स्प्रे? तुम्ही खाताय केमिकल मासे?

Maharashtra Live News Update: कळमेश्वर MIDC मध्ये बोगस युरिया बनविणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाचा छापा

कालव्यात पोहोयला गेले पुन्हा परतलेच नाही; पाण्यातील सिमेंट पाईपमध्ये अडकून ३ तरुणांचा मृत्यू

निवडणूक हरल्याचा राग, ठाकरेंच्या नेत्याचा देवेंद्र शिंदेंवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रायव्हेट ऑडिओ क्लिप व्हायरल; सोशल मीडियावर पोस्ट करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT