Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Bride Chewing Gutkha Viral Video: बोलो जुबां केसरी! गुटखा खाण्याची तलब आवरेना; नवरीने वरातीतच...

Bride Chewing Pan Masala: पाकीट दोन्ही हातात पकडून ही नवरी गुटखा थेट तोंडात टाकते.

Ruchika Jadhav

Bolo Zubaan Kesari: नव-विवाहीत जोडप्यांचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहून डोळ्यांतून अश्रू वाहू लगातात. तर काही व्हिडिओमध्ये जोडप्यांमधील वाद पाहून हसू आवरत नाही. आता देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral Video)

वरातीत वधू आणि वर दोघेही फार खूश असतात. नाचत अन् वाजत गाजत नवरदेव नवरीला घेऊन आपल्या घरी परतत असतो. अशात विविध व्यसने शक्यतो पुरुष मंडळी करतात. गुटखा, पान, तंबाखू खाण्यासाठी ते कुठेही लाजत नाहीत. आपल्या अनोख्या अंदाजात ते गुटखा खातात. मात्र पुरुषांपेक्षाही एका नवरीने आपल्या व्यसनामुळे कहर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नवरदेव आणि नवरी वरातीतून जात असतात. यावेळी प्रवासाचा शीण आल्याने रिफ्रेश होण्यासाठी एक नवरी थेट वरातीत आणि तेही नवरदेवासमोर मस्त गुटख्याचे पाकीट काढते. पाकीट दोन्ही हातात पकडून ही नवरी गुटखा थेट तोंडात टाकते. तिच्या या करामतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सदर व्हिडिओ (@jaina111) या ट्वीटवर अकाउंटवर आशिष जैन यांनी पोस्ट केला आहे. २८ मे रोजी व्हिडिओ पोस्ट केला असून २४ तासांत या व्हिडिओवर १८०० हून अधिक लाईक्स मिळालेत. यावर अनेकांनी लोटपोट हसण्याचे इमोजी पाठवले आहेत. तसेच कमेंटमध्ये बोलो जुबां केसरी अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. एका युजरने सदर नवरी ही एक स्त्री नसून पुरुष असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT