Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भर गर्दीत झोपून प्रवास करायचा? पठ्ठ्याने ट्रेनमध्ये केला भन्नाट जुगाड; व्हायरल VIDEO बघाच

Deshi Jugad Video: सध्या एका तरुणाने केलेल्या भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. व्हायरल व्हिडिओ एकदा पहाच.

Tanvi Pol

Train Viral Video:बस असो वा ट्रेन प्रवास करताना प्रत्येकाला हे तिकीट काढावे लागतेच,मात्र जर लांबचा प्रवास असल्यास प्रत्येकजण अनेक दिवसांपूर्वीच कन्फर्म तिकीट काढतात.बऱ्याचदा अचानक प्रवास करण्याची वेळ येते मग त्याच भयानक गर्दीतून जागा मिळवत प्रवास करावा लागतो,मात्र सध्या व्हायरल होत असाच एका रेल्वे प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एका प्रवाशाने ट्रेनमध्ये जागा न मिळाल्याने चक्क ट्रेनमध्ये दोऱ्यांनी झोपाळा बांधलेला आहे.

सोशल मीडियावर ट्रेन प्रवाशांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.कधी ट्रेनच्या भर गर्दीत क्षुल्लक कारणांवरुन प्रवाशांची हाणामारी होते तर कधी याच ट्रेन(Train)मध्ये जागा मिळवण्यासाठी शोधलेले हटके जुगाड दिसून येतात.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असात आहे.जो प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे.

झोपण्यासाठी केलेली भन्नाट जागा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे.ट्रेनमध्ये असलेल्या सीटवरही अनेक प्रवासी दाटीवाटीने बसलेले आहेत.अशात एका तरुणाने याच गर्दीतून लांबचा प्रवास करण्यासाठी चक्क ट्रेनच्या डब्ब्यात असलेल्या मध्य भागी दोरीने चक्क चौकोनी आकाराची जागा केली,त्यानंतर त्या दोरीवर तरुणाने चादर टाकली,मग काय तरुण चक्क आरामशीर त्यावर झोपला.तरुणाने केलेला हा जुगाड(Deshi Jugad) ट्रेनमधील एका प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

ट्रेनमध्ये केलेला हा जुगाड सध्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '_ya5een.__'या अकाउंटवर अपलोड केलेला आहे.व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वर्गात पाहिला गेला,मग काय नेटकरी वर्गातून अनेक भन्नाट प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये आलेल्या आहेत,त्यातील काही यूजर्संनी तरुणाच्या आयडियाचे कौतुक केलेले आहे तर काहींनी लिहिले आहे की,''हे फक्त भारतात पाहण्यासाठी मिळू शकत'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात साखर उद्योगासाठी ३ हजार कोटींचे प्रकल्प - अमित शहा

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

Gaganbawada Waterfalls : गगनबावड्याच्या हिरव्यागार दऱ्यांतील ५ निसर्गरम्य धबधबे, पाहा पावसाळ्यात खुलणारे नंदनवन!

PM Kisan 23rd installment : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! बँक खात्यात २००० रुपये जमा, स्टेप बाय स्टेप असं करा चेक

SCROLL FOR NEXT