Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाई काय हा प्रकार! लोकल ट्रेनमध्ये थेट थाटला पाणी पुरीचा गाडा; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

Mumbai Viral Video: सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनमधील आहे. ज्यात चक्क पाणीपुरी विकण्यासाठी आलेली आहे.

Tanvi Pol

Mumbai Local Train: सोशल मीडियावर आपल्याला कायम अतरंगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात, या व्हायरल व्हिडिओत जास्तीत जास्त व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनमधील असतात. कारण लोकल ट्रेनमध्ये दररोज अनेक गोष्टी घडत असतात. त्यात पुन्हा एकदा सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे, मात्र सध्या लोकल ट्रेन वादविवाद नसून चक्क पाणीपुरी विकताना एक व्यक्ती दिसत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला मुंबई लोकल ट्रेन दिसत आहे. ज्या लोकल ट्रेनमधला एक डब्बा दिसत आहे. ज्यामध्ये प्रवाशांची गर्दी आहे. मात्र व्हिडिओत तुम्हाला एक व्यक्ती चक्क पाणीपुरी विकताना दिसत आहे तर एक व्यक्ती पाणीपुरी(Panipuri) खाण्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. मात्र यांना पाहून अनेक व्यक्ती हैराण झालेले व्हिडिओत दिसत आहे. त्यातील एका व्यक्तीने सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होताना दिसून येत आहे.

लोकल ट्रेनमधील व्हिडिओ 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@vijay_dhawle'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''मुंबई लोकलमध्ये काहीही होऊ शकते'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या सर्वत्र व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे आज हे काय पाहिले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच'' तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: 7 महिन्यांनंतर RO-KO उतरणार मैदानात; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी कुलदीप OUT हर्षित IN

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT