Stunt Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: स्टेरिंगवर हात न ठेवता काकांनी कार सुसाट पळवली; थरकाप उडवणारा VIDEO पाहून नेटकरी संतापले

Stunt Viral Video: अनेक थरारक अपघात दररोज होत असतात. या अपघाताचे कारणही वेगवेगळे असतात.मात्र आता सोशल मीडियावर एका काकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Stunt Viral Video

अनेक थरारक अपघात दररोज होत असतात. या अपघाताचे कारणही वेगवेगळे असतात. परंतू अपघातांचे मुख्य कारण ड्रायव्हरचा निष्काळजीपणा असतो तर कधी काही मृत्यू स्टंट करण्याच्या नादात होऊन जातात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काही तरुण जीवाची तमा न बाळगता स्टंट करताना आपल्याला दिसून येतात मात्र आता सोशल मीडियावर एका काकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क आपल्या पायांनी कार चालवत आहेत. व्हिडिओ पाहून काका नक्कीच मृत्यूला आमत्रंण देत आहेत.

काकांचा नाद खुळा

व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीस, आपल्याला दिसते की एका महामार्गावर एक कार जात आहे. आजूबाजूला इतर वाहनांची गर्दी जास्त दिसून येत नाही. अशातच रस्त्यावरुन जात असलेल्या कारमध्ये एक काका चक्क त्यांच्या पायांनी कार चालवत आहेत. काका कारचे स्टीयरिंग असलेल्या सीटवर बसायाचे सोडून बाजूच्या सीटवर आरामात बसलेले आहेत.

त्यामध्ये गाडीवरुन जात असलेल्या तरुणांना हे काका कार अशा प्रकारे चालवताना दिसतात. तरुणांना पाहिल्यानंतर काका कारच्या सीटवरून सरळ होऊन बसतात आणि तरुणांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ लागतात. तरीही काका योग्य प्रकारे कार चालवण्याचे नाव घेत नाही.

सोशल प्लॅटर्फाम एक्सवरील@1no_aalsi_या (ट्वीटर) अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. काकांच्या ड्राव्हिंग स्टंटचा व्हिडिओ रस्त्यावरुन जात असलेल्या तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. मात्र कुठल्या शहरातील हा व्हायरल व्हिडिओ आहे हे समजू शकल नाही.

व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्सही मिळत आहेत. नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत असून काकांच्या व्हिडिओवर यूजर्स संताप व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT