Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भारतातील कामगार दुबईत कसे जगतात जीवन? व्हायरल VIDEO मधून समोर आली भीषण परिस्थिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घराची जबाबदारी अंगावर आली की लहान मुलं ही मोठी होतात. सोशल मीडियावर आपण अनेकांना कामानिमित्ताने महाराष्ट्र नाही तर अन्य देशात जाताना पाहिले आहे. कामानिमित्ताने परदेशात जाणारे व्यक्ती अनेकदा उच्च शिक्षित असतात तर कधी कामगार असतात. जर आपण भारत देशाचा विचार केला तर भारतातील अनेक व्यक्ती कामगार म्हणून अन्य देशात जातात. सध्या हे बोलायचे म्हणजे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्या व्हायरल व्हिडिओत तब्बल हजारोंच्या संख्येने दुबईमध्ये मजूर कसे वास्तव्यास आहेत हे दाखवले आहे.

आपल्यापैंकी अनेकजण कायम भारताशिवाय अन्य देशात पर्यटनासाठी जात असतात. खास करुन दुबईमध्ये जाणारा पर्यटक(Tourist) वर्ग जास्त आहे. दुबईमधील प्रत्येक गोष्ट अर्थात तेथील लोकांची जीवनपद्धती या सर्व गोष्टी भिन्न आहेत आणि सोशल मीडियावर आपल्याला कायम ग्लॅमरस (Glamorous) गोष्टी दिसून येतात. मात्र सध्या सोशल मीडियावर दुबईमधील एक कामगारांचे एक वेगळे जीवन दाखवणारा व्हिडिओ व्हायरल (Viral)झालेला आहे, जो पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलेले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक भल्या मोठ्या आकाराचा हॉल दिसून येत आहे. तुम्ही व्हिडिओत पाहाल तेवढ्या लांबच लांब डब्बल बेड दिसून येत आहेत. मात्र या बेडवर अनेकजण झोपलेले दिसून येत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''दुबईमध्ये बांधकाम मजूर झोपलेले आहेत'' असे लिहिण्यात आलेले आहे. या कॅप्शनवरुन तुम्हाला समजलेच असेल संपूर्ण हॉलमध्ये असलेले बेड कोणासाठी आहेत आणि त्यावर कोण झोपलेले आहे. या व्हिडिओवरुन लांबून आलेल्या कामगारांची अवस्था काय आहे ते या व्हिडिओमधून दिसून येत आहे.

दुबईमधील व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@the_construction_expe'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच तब्बल ३ दिवसांत ३० हजाराहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे तर अनेकांनी व्हिडिओला प्रतिक्रियाही केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने प्रतिक्रिया केलेली आहे की,'' देवा काय हे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' आपण नशीबवान आहोत की आपण त्यांच्यामध्ये नाहीत'', अशा संवेदनशील प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आंदोलन स्थगित

Bachchu Kadu : आमदार निवासात 'प्रहार'

Rain Alert : पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपलं; सोलापुरात नद्यांना पूर, पुणे पुन्हा पाण्यात

Konkan : वाळूचा डोंगर बनला पर्यटनाचे आकर्षण

Girish Mahajan : देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून काही होणार नाही; गिरीश महाजन जरांगेंना असे का म्हणाले? वाचा

SCROLL FOR NEXT