Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कुणी तरी येणार येणार... लोकलमध्ये तरूणांनी केली अशी ही बनवा बनवी, व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local Viral Video: सोशल मीडिवार तुम्हाला अतरंगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही तरुण- तरुणींचा आहे. नक्की लोकल ट्रेनमध्ये काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Funny Viral Video: मुंबई लोकल ट्रेनमध्ये वारंवार विविध किस्से घडत असतात. मात्र, अलीकडेच घडलेली एक गोष्ट मात्र भन्नाट ठरली आहे. एका लोकलच्या डब्ब्यात काही तरुण-तरुणींनी असा गोंधळ घातला आहे की, अन्य प्रवाशांजवळ पोट धरुन हसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सध्या लोकल ट्रेनमधील तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे.

लोकलमध्ये तरुणांची धमाल!

व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, काही मित्र-मैत्रिणींचा एक गट लोकल ट्रेनमधून प्रवास करत असतात. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यांच्यातील एका तरुणाला गरोदर महिलेसारखा अभिनय करण्यास सांगितला आणि मग त्यांच्या गटातील तरुणी 'बनवा-बनवी'' या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करु लागल्या. तरुण-तरुणींचा गंमतीदार अभिनय आणि त्यावर धम्माकेदार डान्स, असे सर्व पाहून अन्य प्रवाशी अत्यंत खुष झालेले दिसत असून प्रवासाचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

लोकल ट्रेनच्या गर्दीत असा टेन्शन विसरायला लावणारा प्रसंग क्वचितच पाहायला मिळतो. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून iamgautamivalam या अकाउंंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. एक दिवसापूर्वी व्हायरल झालेल्या या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहे शिवाय फेसबूक आणि अन्य माध्यमांवर या गंमतीदार व्हिडिओला शेअर करण्यात येत आहे.

हा व्हिडिओ (Video) व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया महाराष्ट्रातील अनेक नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने कमेंट केली,''अगं बाई हे काय'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''एकदम मस्त राव,तरुण काय करतील सांगता येत नाही'' शिवाय अन्य यूजर्संनी गंमतीदार प्रतिक्रियाच केलेल्या आहेत.

टीप: तरुणांच्या या धम्माल-मस्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

SCROLL FOR NEXT