Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Bride Viral Video : पोराला न्यायाला पोरगी दारात, लग्नाआधी नवरीची गावभर मिरवणूक; पाहा VIDEO

Viral Photo: सोशल मीडियावर कायम अनेक थरारक व्हिडिओ किंवा फोटो कायम व्हायरल होत असतात. त्यात आज पुन्हा काही फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही नक्की आवडेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघांताच्या तसेच अनेक तरुणांच्या स्टंटच्या घटना व्हायरल होत आहेत. तर सध्या मुसळधार पाऊस सुरु झाला असल्याने अनेक विचित्र घटना समोर येत असतात.मात्र त्यात बुलडाणा जिल्ह्यातील एक वेगळी घटना समोर आली आहे. जी घटना नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पंसतीस येत आहे.

लग्न म्हटले की, डीजेच्या तालावर वाजतगाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेते. ही प्रथा सर्वत्र रूढ आहे. मिरवणुकीच्या वेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर, रुसवे, फुगवे पाहावयास मिळतात. जणू वरानेच घोड्यावर बसण्याचा ठेका घेतलाय. ही मक्तेदारी मोडीत काढत शेतकरी कुटुंबाने आपल्या नवरी मुलीची चक्क मिरवणूक घोड्यावर काढल्याचे हातनी येथे पहावयास मिळाले.

बुलडाणा जिल्ह्यातील हातनी येथील शेतकरी संजय जाधव यांनी आपली मुलगी( girl)नववधू निकिता हिची गावातून घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक काढली. मुलासमान मुलगीही असते, हा भेदभाव न करता या कृतीतून जाधव परिवाराने समाजाला दाखविलेय.निकिताचा विवाह नुकताच दिवठाणा येथील धनंजय मोरे यांचेशी थाटामाटात पार पडला.

तत्पूर्वी सकाळी वधू (bride)निकिताची घोड्यावरून गावातून डीजेच्या तालावर तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती.जाधव परिवाराने हा विवाह अनोख्या पद्धतीने करून समाजापुढे आदर्श ठेवलाय. समाजाला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश ही यातून दिलाय.

बुलडाणा जिल्ह्यातील वरातीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवरील @mrbeen979619 या अकाउंटवर फोटो शेअर करण्यात आलेले आहे. व्हिडिओ शेअर होताच नेटकऱ्यांच्या पंसतीस येत आहेत. सोशल मीडियावर ( Media )याआधी ही अनेक अशा घटना व्हायरल झाल्या आहेत . जसे की घटस्फोट झालेल्या मुलीली वडिलांनी ढोल-ताशांच्या गजरात परत अभिमानाने घरी आणले होते. असे विषय नेटकऱ्यांच्या कायम पंसतीस येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT