Viral news Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणाचा जीवघेणा प्रवास! ट्रेनखालील ट्रॉलीवर बसून गाठलं २५० किमी अंतर, व्हिडिओ पाहून सर्वच चक्रावले

Video on Social Media: व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील तरुणाने इटारसी ते जबलपूर हा २५० किमीचा प्रवास ट्रेन खाली असलेल्या ट्रॉलीमध्ये बसून केला आहे.

Saam Tv

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही व्हिडीओ पाहून भीती वाटते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमधील तरुणाने ट्रेनच्या खालच्या भागातील ट्रॉलीमध्ये बसून तब्बल २५० किमीचा प्रवास केला आहे. जबलपूर रेल्वे स्टेशनवर या तरुणाला पकडण्यात आल्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली.

व्हिडीओमधील तरुण ट्रेनच्या खाली बसून प्रवास करत होता. २५० किमीपेक्षा जास्त अंतर त्याने धोकादायक स्थितीमध्ये पार केले होते. लांबच्या पल्ल्याच्या ट्रेनच्या बोगीखाली ट्रॉली असते. या ट्रॉलीमध्ये लपून बसून त्याने हा जीवघेणा प्रवास केला होता. दरम्यान लोकांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला पाहिले आणि त्याला बाहेर काढले. हा व्हिडीओ तेव्हा रेकॉर्ड करण्यात आला.

मध्यप्रदेशमधील जबलपूर रेल्वे स्थानकावर 12149 पुणे दानापूर एक्स्प्रेस आली. एक्स्प्रेस गाडी स्थानकावर थांबल्यानंतर रेल्वे कर्मचारी रोलिंग आणि अंडर गियर यांची चाचणी करु लागले. चाचणी सुरु असताना कर्मचाऱ्यांना ट्रेनच्या खालच्या बाजूला असलेल्या ट्रॉलीमध्ये एक तरुण असल्याचे दिसले. त्यांनी तरुणांना बाहेर काढले आणि रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केले. त्याने इटारसी ते जबलपूर हा २५० किमी लांब प्रवास अशा परिस्थितीमध्ये केला होता.

पश्चिम मध्य रेल्वे जबलपूरचे सीपीआर हर्षित श्रीवास्तव यांनी प्रकरणाची माहिती दिली. ट्रेनच्या बोगीखालच्या ट्रॉलीमध्ये बसून प्रवास करणाऱ्या तरुणाला आम्ही ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. ट्रॉलीमध्ये बसून २५० किमीचे अंतर कसे पार केले याची माहितीही आम्ही घेणार आहोत, असे हर्षित यांनी सांगितले. सध्यातरी जबलपूर रेल्वे पोलिसांनी तरुणाला ताब्यात ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT