Viral news x
व्हायरल न्यूज

Viral : घरकाम करणाऱ्या बाईला ४५,००० हजार पगार, मालकिणीने बनवला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले...

Viral Video : एका महिलेने तिच्या मासिक खर्चाची माहिती देणारा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये महिलेने 'आम्ही घरकाम करणाऱ्या बाईला ४५ हजार रुपये पगार देतो', असे म्हटले.

Yash Shirke

  • एका महिलेने तिच्या मासिक खर्चाचा तपशील सांगणारा व्हिडीओ शेअर केला.

  • या व्हिडीओमध्ये तिने घरकाम करणाऱ्या बाईला ४५ हजार पगार देतो असे म्हटले.

  • नेटकऱ्यांनी व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral News : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बंगळुरूमध्ये राहणारी महिला वाढत्या महागाईवर चर्चा करत असल्याचे पाहायला मिळते. ही महिला व्हिडीओमध्ये तिच्या मासिक खर्चाची माहिती देते. मी माझ्या घरी काम करण्यासाठी येणाऱ्या बाईला महिन्याला ४५,००० रुपये पगार देते असा खुलासा महिलेने केला. या व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओमधील रशियन महिलेचे नाव युलिया अस्लामोवा असे आहे. ती मागील ११ वर्षांपासून बेंगळुरूमध्ये राहत आहे. तिने इंस्टाग्रामवर तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांच्या मासिक खर्चाची माहिती देणारा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तिच्या या व्हिडीओमध्ये सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

'माझ्या कुटुंबाचा एकूण मासिक खर्च अंदाजे ३,००,००० रुपयांपर्यंत पोहोचतो. यातील सर्वात मोठा भाग घराभाड्यामध्ये जातो. आमचे १.२५ लाख रुपये घरभाड्यासाठी खर्च होतात. जेवण, घरखर्चावर सुमारे ७५,००० रुपये, मुलाची शाळेची फी ३०,००० रुपये असा मासिक खर्च आहे. हेल्थ आणि फिटनेसवर ३०,००० रुपये खर्च केले जातात. पेट्रोलसाठी आणि फिरण्यासाठी ५ हजार रुपये खर्च होतो. एका लहान कुटुंबाला बंगळुरूमध्ये आरामदायी जीवन जगण्यासाठी किमान २,५०,००० ते ३,००,००० रुपयांची गरज आहे', असे युलियाने व्हिडीओमध्ये म्हटले होते.

व्हिडीओमध्ये मासिक खर्चाबद्दल सांगताना युलियाने आम्ही घरकाम करणाऱ्या महिलेला दरमहा ४५,००० हजार पगार देतो असे म्हटले. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा होत आहे. एका यूजरने माझ्या कंपनीतील इंजिनिअरलाही इतका पगार नाहीये असे म्हटले. घरकाम करणाऱ्या महिलेला माझ्यापेक्षा जास्त पगार आहे अशी कमेंट केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT