Man marries rice cooker Saam tv
व्हायरल न्यूज

Weird Wedding : आता काय म्हणावं! लग्नासाठी मुलगी मिळेना, पठ्ठ्याने कुकरसोबत केलं लग्न, पण...

Vishal Gangurde

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एका इंडोनेशियाच्या तरुणाच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. इंडोनेशियाच्या तरुणाने एका मुलीशी नाही, तर एका कुकरसोबत लग्न केलं आहे. इंटरनेटवर या अजब लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अजब लग्नावरून नेटकरी या तरुणाची खिल्ली उडवत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तरुणाचं नाव अनम आहे. या तरुणाने पांढऱ्या रंगाचा पोशाख घातला आहे. तर 'नवरी'ने घुंघट परिधान केला आहे. म्हणजे कुकरवर एक कपडा आहे. या तरुणाने आज्ञा पाळणारी, प्रेमळ आणि जेवण बनवण्यात हूशार अशी स्तुती करत कुकरची लग्नासाठी निवड केली आहे. मात्र, या तरुणाने लग्नानंतर अवघ्या चार दिवसांनीच कुकरशी घटस्फोट घेतला आहे. बायको फक्त भात शिजवते, असं म्हणत त्याने घटस्फोट दिला आहे.

स्वत: केला लग्नाचा फोटो शेअर

या तरुणाच्या लग्नाची पोस्ट सोशल मीडियावर जंगलाला वणवा लागल्यासारखी पसरली आहे. ही घटना सप्टेंबर २०२१ सालची असल्याची माहिती मिळत आहे. अनमने स्वत: लग्नाचे फोटो त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केले होते. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.

तरुणाचा प्रसिद्धीसाठी स्टंट

स्थानिक माध्यमांनी तरुणाने प्रसिद्धीसाठी स्टंट केल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचं लक्ष केंद्रीत करण्यासाठी कुकरशी लग्न केल्याचं सांगण्यात येत आहे. अनम इंडोनेशियात चर्चेत राहणार तरुण आहे. तो नेहमी अशाच प्रकारचे अजब स्टंट प्रसिद्धीसाठी करत असतो.

काही महिन्यांपूर्वी ब्राझीलचे साओ पाउलोच्या मॉडेल क्रिस गॅलेराने स्वत:शी लग्न करून जगाला चकीत केलं होतं. तेव्हा क्रिसने आत्मनिर्भर राहण्यासाठी स्वत:शी लग्न केल्याचं म्हटलं होतं. तसेच कोणाच्याही आधाराची गरज नसल्याचेही तिने म्हटलं होतं.

दरम्यान, काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी वादग्रस्त पाऊल उचलतात. अशा प्रकारच्या घटना भारतातही घडल्या आहेत. सोशल मीडियावर अशा घटना प्रचंड वेगाने व्हायरल होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT