Viral Dance Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Dance Video: राखी, नोरा अन् गौतमी; भावाच्या डान्सपुढे सगळ्या फेल! 'टीप टीप बरसा पाणी' गाण्यावर धरला असा ठेका.. व्हिडिओ

Boy Dance On Tip Tip Barsa Pani Song Viral Video: गौतमीपेक्षा भारी अदा अन् नोरापेक्षा जबराट तोराही या तरुणाच्या डान्सपुढे फिका पडेल.. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Gangappa Pujari

Boy Dance In Saree On Bollywood Song: सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळत असतात. हे व्हायरल व्हिडिओ कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात, तर कधी पोट धरुन हसायला लावतात. यामध्ये भन्नाट डान्स व्हिडिओंची तर नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये एका तरुणाने साडी घालून केलेला डान्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. साडीमध्ये या तरुणाने अशा काही अदा दिल्यात ज्या पाहून तुम्हीही चक्रावून जाल.. (Viral Dance Video)

तरुणाचा जबराट डान्स...

सध्याची तरुणाई सोशल मीडियावर (Social Media) फेमस होण्यासाठी काय करेल.. काही सांगता येत नाही. कधी रस्त्यावर डान्स करुन, तर कधी मेट्रोमध्येच ताल धरुन तरुण- तरुणी लक्ष वेधत असतात. सध्या अशाच एका अतरंगी तरुणाच्या डान्सचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आजपर्यंत तुम्ही अनेक डान्स व्हिडिओ पाहिले असतील. पण ह्या तरुणाचा स्वॅग अन् ताल सर्वात निराळा आहे. तरुणाने थेट साडी घालून बॉलिवूडच्या प्रसिद्ध टीप- टीप बरसा पाणी या गाण्यावर असा काही ताल धरलायं. जो पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. व्हिडिओमधील तरुणाच्या एकेक अदा आणि स्टेप्स पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत.

पोरीही पडतील फिक्या...

सध्या सोशल मीडिया लावणी कलावंत गौतमी पाटील ( Dancer Gautami patil) चांगलीच चर्चेत आहे. तर बॉलिवूडमध्ये नोराच्या (Nora Fatehi) डान्सचा जबराट तोरा पाहायला मिळत आहे. पण या तरुणाच्या डान्सपुढे त्यासुद्धा फिक्या पडतील.. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

या प्रतिक्रियांवरुन तरुणाने घातलेली साडी अन् त्याचा पावसातला हा जबराट डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडल्याचे दिसत आहे. amit_the_shinning_star या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत हा व्हिडीओ ३ लाख ९२ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे.

टीप टीप बरसा पाणी; गाण्याबद्दल...

बॉलिवूडमधील (Bollywood Song) सर्वात लोकप्रिय गाण्यांमध्ये या गाण्याचा समावेश होतो. ९० च्या दशकातील हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. लोकप्रिय गायक उदित नारायण (Udit Narayan) आणि अलका यागनिक (Alka Yagnik) यांनी गायलेल्या या गाण्यावर अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tandon) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी डान्स केला होता. सध्या या तरुणाच्या डान्सने पुन्हा एकदा रविनाच्या डान्सच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारूबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

SCROLL FOR NEXT